भद्रावतीत महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
भद्रावती शहरातील झाडे प्लॉट परिसरात एका महिलेने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (दि.१०) दुपारी २ ते ३ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मृत महिलेचे नाव नंदा नरेंद्र बोबडे (वय ३५) रा. झाडे प्लॉट, भद्रावती असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, घटनेच्या वेळी महिलेचे सासू-सासरे बाहेर गेले होते तर पती कामानिमित्त घराबाहेर होते. घरात कोणीही नसल्याचा फायदा घेत नंदा बोबडे यांनी घरातील छताला दोर बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली.
काही वेळानंतर कुटुंबीय घरी परतल्यानंतर ही घटना उघडकीस आली. तत्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करून मृतदेह पुढील तपासासाठी रुग्णालयात पाठविला.
दरम्यान, आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समोर आले नसून भद्रावती पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.



