अवैद्य रेती वाहतूक करणारे दोन वाहन जप्त
गौण खनिज भरारी पथकाची कारवाई

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
भद्रावती तालुक्यात अवैध रेती वाहतुकीवर महसूल विभागाच्या अवैध गौण खनिज भरारी पथकाने धडक कारवाई केली. मौजा पारोधी घाट, ता. भद्रावती येथे दिनांक १० मार्च २०२६ रोजी सकाळी ६.४५ वाजताच्या सुमारास एक ब्रास रेतीची अवैध वाहतूक करत असलेले वाहन पकडण्यात आले.
तसेच भद्रावती येथील जुना बस स्टॅन्ड परिसरात पहाटे ४. २५ वाजताचे दरम्यान ट्रॅक्टर क्रमांक एम एच ३४ बी वी ०१२१ हे एक ब्रास रेतीची अवैध वाहतूक करताना भरारी पथकाच्या निदर्शनास आले. संबंधित दोन्ही वाहनांवर कारवाई करून वाहने तहसील कार्यालय भद्रावती येथे जमा करण्यात आली आहेत.
ही संपूर्ण कारवाई तहसीलदार राजेश भांडारकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून महसूल विभागाकडून अवैध गौण खनिज वाहतूक रोखण्यासाठी सातत्याने धडक मोहिम राबविण्यात येत आहे. प्रशासनाकडून पुढील काळातही अशा प्रकारच्या कारवाया सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.



