ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

रेल्वेचा विकास मात्र भद्रावती पालिका क्षेत्रातील रस्ते भकास

स्थानिक स्वराज्य संस्थेसह पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

    भद्रावती येथील रेल्वे मार्गाचे विस्तारीकरण होत असताना दुसरीकडे मात्र रेल्वे ठेकेदारमार्फत वाहतूक नियमांची पायमल्ली करून नगर परिषद क्षेत्रातून अवजड वाहतूक होत असल्याने आधीच जर्जर असलेल्या मुख्य मार्गाची दुर्दशा होत आहे.

झपाट्याने फुगणारी हि नगरी रस्त्यांच्या बाबतीत अजूनही मागास असल्याची जाणीव पदोपदी येते त्यात या शहराला सर्वांनाच आवागमन करण्यासाठी स्व.बाळासाहेब ठाकरे प्रवेशद्वार ते रेल्वे स्टेशन हाच एक अनिर्वाय रस्ता असल्याने तद्वतच बाजार व व्यापारी प्रतिष्ठाने, शाळा, महाविद्यालय, प्रसिद्ध मंदिरे याच एकमेव मार्गावर असल्याने विद्यार्थी, नागरिक, पर्यटक, व्यापारी यांना याच मार्गाचा अवलंब केल्याशिवाय पर्याय नाही. मात्र सतत च्या अवजड वाहतुकीमुळे होणारे प्रदूषण, अपघाताची भीती, कर्कश आवाज , उडणारी धूळ यामुळे नागरिक पुरते हैराण झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

स्थानिक नगर परिषद प्रशासन, स्थानिक पोलिस व वाहतूक अधिकाऱ्यांच्या नाकावर टिच्चून लिंबू पिळून दिवसाढवळ्या होत असलेल्या अवजड वाहतुकीमुळे नागरिक, व्यापारी, पर्यटक, विद्यार्थी , शाळा, व धार्मिक स्थळे प्रभावित होत आहे.

एरवी लहानसहान कारणास्तव दंडात्मक कार्यवाही चा बडगा उभारणारा पोलिस विभाग या अवजड वाहतुकीकडे दुर्लक्ष करीत असल्याने स्थानिक नागरिकांनी नगर परिषद व पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. केंद्र विरुद्ध राज्य या विरोधाभासात राज्य सरकारचे प्रशासन कार्यवाही करण्यास धजावत तर नसेल ना हा हि प्रश्न उपस्थित होत आहे.

अथवा छूप्या आर्थिक व्यवहारातून तर हि अवजड वाहतूक सुरू नसेल अशी कुजबुज सर्वत्र होत आहे. दिवसा व वर्दळीच्या वेळी अवजड वाहतुकीस प्रतिबंध घालण्यात यावा अशी मागणी नागरिक, व व्यापारी वर्गातर्फे करण्यात येत आहे.

नगर परिषद भद्रावती चे नगराध्यक्ष प्रफुल चटकी यांच्याशी बातचीत केली असता या वाहतुकीवर निर्बंध लावण्यासबंधी रेल्वे व पोलीस प्रशासनाशी पत्रव्यवहार करून भद्रावती कराना दिलासा देऊ असे स्पष्ट केले.

भद्रावती शहरातून होणाऱ्या या अवजड व नियमबाह्य वाहतुकीस प्रतिबंध करण्यासंबंधी पालिकेतर्फे पाऊले उचलण्यात येतील. रेल्वे प्रशासन व स्थानिक पोलिस स्टेशन यांचेशी पत्रव्यवहार करून हि समस्या सोडवू.

मात्र अवजड व नियमबाह्य अथवा अवैध वाहतूक याबाबत कार्यवाहीची जबाबदारी हि वाहतूक अधिकारी व स्थानिक पोलिसांची आहे.

         प्रफुल चटकी, नगराध्यक्ष नगर परिषद भद्रावती

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये