वर्धा जिल्हा सराफांच्या सुरक्षा विषयक समस्यांचे निराकरण संबंधाने “सराफा दक्षता समिती” बैठक

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
वर्धा जिल्ह्यातील सराफा व्यवसायिकांकडुन चोरीची / संशईत मालमत्ता जप्त करतांना तपासी अधिकाऱ्यांनी पाळावयाचे मार्गदर्शक तत्वे तसेच सराफांच्या अडचणी सोडविण्याकरीता श्री. सौरभ कुमार अग्रवाल, पोलीस अधीक्षक, वर्धा यांचे अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय सराफा दक्षता समितीची बैठक पोलीस अधीक्षक कार्यालय, वर्धा येथे दि. ०७.०३.२०२६ रोजी सकाळी ११.०० वा. आयोजित करण्यात आली होती.
सदर बैठकीमध्ये तपासी अधिकारी यांनी थेट सराफांचे दुकानात जावुन कारवाई न करता संबंधीत प्रकरणाची प्रथम चौकशी करुन नेमलेल्या सराफा दक्षता समिती मार्फतीने पुढील कारवाई करावी. संपुर्ण सराफा बाजारात व इतर ठिकाणी सोन्या चांदीचे व्यापार करणारे, गहाण ठेवणारे सुवर्णकार व त्यासंबंधाने काम करणारे सर्व व्यक्ती यांची ओळख पटविण्याकरीता आवश्यक मुलभुत माहीती संबंधीत पोलीस स्टेशनला द्यावी.
तसेच सराफ व्यवसायिक यांनी त्यांचे दुकानात दागीने किंवा संशईत मालमत्ता विक्री करणे करीता येणाऱ्या ग्राहकांची ओळख पटवुन घेण्याकरीता ओळखपत्रांची छायांकीत प्रत घ्यावी व त्याबाबत संबंधीत नोंदवहीत नोंद करावी. सोन्या चांदीचे दागीने अथवा वस्तु विक्री करीता सराफा दुकानात आलेल्या व्यक्तीवर संशय आल्यास त्याबाबत संबंधीत पोलीस स्टेशन किंवा स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा येथे तात्काळ कळविणेबाबत सुचना देण्यात आल्या. सराफा व्यवसायिकांच्या सुरक्षा व समस्या याबाबत महाराष्ट्र शासनाचे परीपत्रक संबंधाने उपस्थित सराफ व्यवसायिक यांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच सराफ व्यवसायिक यांच्या समस्यांबाबत मा. पोलीस अधीक्षक सा. यांचेशी चर्चा केल्याने तात्काळ सराफा व्यवसायिकांचे समस्यांचे निराकरण करण्यात आले. वर्धा जिल्हा सराफा व्यवसायिकांकडुन सराफा दक्षता समिती स्थापण केलेबाबत मा. पोलीस अधीक्षक साहेब यांचा सत्कार करण्यात आला.
सदरची बैठक श्री. सौरभ कुमार अग्रवाल, पोलीस अधीक्षक, वर्धा यांचे अध्यक्षतेखाली पार पडली असुन सदर बैठकी करीता श्री. सदाशिव वाघमारे, अपर पोलीस अधीक्षक, वर्धा, श्री. विनोद चौधरी, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा तसेच सराफ व्यवसायिक श्री. अमोल ढोमणे, श्री. देविदास करंडे, श्री. रोहन कठाणे, श्री. सौरभ ढोमणे, श्री. परसन कोठारी, श्री. गुंजन टिबळेवाल, श्री. प्रशांत चिंचमलातपूरे, श्री. नरेश करंडे, श्री. विक्रम देवगीरकर असे प्रत्यक्ष हजर असुन सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, वर्धा जिल्हा व सर्व ठाणेदार, वर्धा जिल्हा हे सदरचे बैठकीकरीता व्हिडीओ कॉन्फरंसव्दारे हजर होते.



