ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गावठी हातभटटीवर सावंगी मेघे पोलीसांची धडक कार्यवाही

एकूण 2 लाख 54 हजारावर मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

पो स्टे सावंगी मेघे येथील पोलीसांची कार्यवाही सावंगी पोलीस पो स्टे परीसरात पेट्रोलीग करीत असतांना मुखबीर कडुन खात्रीशिर खबर मिळाली की मौजा पांढरकवडा पारधी बेडा येथे राहणारी सौ वनमाला रेशींदा फुलमाळी वय 40 वर्ष रा. पांढरकवडा पारधी बेडा ता जि वर्धा हि तिचे राहते घराचे मागे खाली जागेत गावठी मोहा दारूची भटटीलावुन दारू गाळत आहे. अशा खबरेवरून पंच व पो स्टॉफसह पांढरकवडा पारधी बेडा येथील सौ. वनमाला फुलमाळी हिचे घराचे पाठी मागे गेलो असता मौक्यावर मिळुन आली 1) 4 जमीनीत गाडलेल्या प्लास्टीक ड्रममध्ये प्रती डम 200 लिटर प्रमाणे एकुण 800 लिटर कच्चा मोहा रसायण प्रती लिटर 200/- रू प्रमाणे 1,60,000/- रू 2) 4 लोखंडी ड्रम मध्ये प्रती ड्रम अंदाजे 100 लिटर उकळता मोहा रसायण सडवा एकुण 400 लिटर प्रती लिटर 200/- रू प्रमाणे 80,000/- रू 3) 1 प्लास्टीक डबकीमध्ये 28 लिटर गावठी मोहा दारू 200/- रू लिटर प्रमाणे 5,600/- रू 4) 4 प्लास्टीक ड्रम प्रती डम 1000/- रू प्रमाणे 4000/- रू 5) 4 लोखंडी ड्रम प्रती डम 1000/- रू प्रमाणे 4000/- रु 6) 1 प्लास्टीक डबकी 200/- रू 7) इतर भटटी साहित्य 1000/- रू असा एकुण जु.कि. 2,54,800/- रू चा माल हात भटटी लावुन अवैधरित्या मिळुन आल्याने पंचनामा कार्यवाही दि.05/03/2026 रोजीचे 20:00 ते 20:30 वा पुर्ण करून नमुद महीला आरोपी विरूध्द लेखी फिर्याद वरून सदरचा गुन्हा नोंद करून तपासात घेतला.

सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल, मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्री. सदाशिव वाघमारे, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी वर्धा श्री. प्रमोद मकेश्वर यांचे मार्गदर्शनात पोलीस स्टेशन सावंगी मेघेचे ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज वाघोडे, पोहवा चंदु सानोने ब.नं 910, पोहवा नितीन भगत ब.नं. 1134, पोशि वैभव जगणे ब.नं 1555, सर्व नेमुणकीस पोलीस स्टेशन सावंगी मेघे यांनी केली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये