ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महाराष्ट्राचा सादर झालेला अर्थसंकल्प शेतकरी, कामगार आणि सर्वसामान्य जनतेसाठी अत्यंत निराशाजनक _ डॉ अभ्युदय मेघे 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

या अर्थसंकल्पात ग्रामीण भागाच्या विकासापेक्षा शहरी मतदारांना खुश करण्यावर अधिक भर दिलेला दिसतो. मेट्रोसारख्या प्रकल्पांवर आणि मोठ्या कॉन्ट्रॅक्टरांवर जास्त लक्ष देण्यात आले आहे, तर शेतकऱ्यांच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष झालेले दिसते.

शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी जाहीर करण्यात आली असली तरी ती सरळ आणि स्पष्ट न करता अनेक अटी व जाचक नियम घालून करण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्यक्षात अनेक शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळणे कठीण होणार आहे. त्यामुळे ही कर्जमाफी शेतकऱ्यांची फसवणूक असल्याची भावना निर्माण झाली आहे.

तसेच, सरकारने लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचे आश्वासन दिले होते, परंतु या अर्थसंकल्पात त्याबाबत कुठेही स्पष्ट उल्लेख दिसत नाही. त्यामुळे महिलांमध्येही नाराजी निर्माण झाली आहे.

एकूणच हा अर्थसंकल्प शेतकरी, कामगार आणि सर्वसामान्य जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यात अपयशी ठरला असून तो निराशाजनक असल्याची स्पष्ट मत महाराष्ट प्रदेश कॉंग्रेसचे सचिव डॉ अभ्युदय मेघे यांनी व्यक्त केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये