ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

प्रा. चतुरदास तेलंग यांना आचार्य पदवी 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे 

जिवती :- चंद्रपूर जिल्ह्यातील अतिशय दुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिवती येथील विदर्भ कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स च्या राज्यशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख प्रा. चतुरदास जानबा तेलंग यांनी गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथे नुकताच शोध प्रबंध सादर केला होता. “नागपूर आणि चंद्रपूर लोकसभा खासदारांच्या लोकसभेतील कामकाजाचा चिकित्सक अभ्यास (२००९ ते २०१९)” हा त्यांच्या शोध प्रबंधाचा विषय होता त्यांचे मार्गदर्शक म्हणून सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर येथील राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. प्रमोद शंभरकर हे होते.

मौखिक परीक्षेला बहिष्य परीक्षक म्हणून प्रताप महाविद्यालय अंमलनेर जि. जळगाव येथील डॉ. संदीप नेरकर उपस्थित होते.

आचार्य पदवी बहाल झाल्याबद्दल श्री. व्यंकटेश बहुउद्देशीय संस्था गडचांदूर चे सर्व पदाधिकारी तसेच महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. एस. एच. शाक्य व महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी आचार्य पदवी मिळाल्याबद्दल अभिनंदन केले संशोधनकार्यात त्यांचे भाऊ शुद्धोधन तेलंग आई जयवंताबाई तेलंग पत्नी रमाबाई तेलंग दोन मुली सृष्टी आणि निसर्गा यांचे मोलाचे योगदान मिळाले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये