ट्रॅक्टर अपघातातील गंभीर जखमी यश मेश्राम ने घेतला अखेरचा श्वास
गेल्या ४०दिवसापासून मृत्यूशी झुंज

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार
ब्रह्मपुरी :_ दिनांक २६ जानेवारी २०२६ ला सकाळी ६-०० वाजे दरम्यान गणराज्य दिनानिमित्त ध्वजारोहण व एनसीसी परेड साठीअ-हेनवरगांव येथून भालेश्वर येथील वर्ग मित्रासह स्कुटीने नेवजाबाई हितकारणी विद्यालय, ब्रह्मपुरी येथे जात असतांना कुर्झा बोंडेगाव रस्त्यावरती राधाकृष्ण नगरीजवळ विरुद्ध दिशेने येणाऱ्या रेतीच्या ट्रॅक्टरने जबर धडक दिली.
त्या धडकेत यशच्या डोक्याला जबर मार लागल्यामुळे तो आस्था हॉस्पिटल ब्रह्मपुरी येथे उपचार घेत होता. परंतु आज उपचारादरम्यान रात्रो १-०० वाजता त्याचा मृत्यू झाला. वय वर्षे १४ वर्ग – ९ चा विद्यार्थी. त्याच्या मृत्यूमुळे दिलीप मेश्राम याच्या कुटुंबीयांवरती दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तो आई-वडिलांना एकच मुलगा होता.
मुलगा सैनिक होईल हे स्वप्न त्यांचे धुळीस मिळाले. यशच्या मृत्यूमुळे नेवजाबाई हितकारणी विद्यालय, तसेच अ-हेरनवरगांव व भालेश्वर गांव वासिय हळहळ व्यक्त करीत आहेत. आदर युक्त या विद्यार्थ्यांसाठी अ-हेरनवरगांवावर शोककळा पसरली आहे.



