छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
वर्धा : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्यकर्तृत्व व शौर्यावर आधारित विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 18 व 19 फेब्रुवारी रोजी कार्यक्रम पार पडणार आहेत.
दि.18 फेब्रुवारी रोजी सकाळी 10.30 वाजता विकास भवन, वर्धा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित नाट्य प्रदर्शित करण्यात येणार आहे. तसेच दि. 19 फेब्रुवारी रोजी सकाळी 10.30 वाजता महाराजांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनकार्यावर आधारित विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय, जिल्हा प्रशासन, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने करण्यात येत आहे.
दि.19 फेब्रुवारी रोजी कार्यक्रमाचे उद्घाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार असून जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व मान्यवर अधिकारी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे, असे जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी कळविले आहे.



