ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गुरुकुल महाविद्यालयात नव मतदार नोंदणी शिबिर संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

          गुरुकुल कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नांदा येथे दिनांक 10 ऑक्टोबर 2026 रोजी नव मतदार नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी गुरुकुल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश शेंडे, नव मतदार नोंदणी नोडल अधिकारी डॉ. राजेश डोंगरे, डॉ. प्रशांत पुराणिक, प्रा. आशिष पईनकर, प्रा.सचिन कर्णेवार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

             सदर कार्यक्रमात प्राचार्य डॉ. प्रकाश शेंडे यांनी विद्यार्थ्यांना आव्हान केले की वयाची 18 वर्षे पूर्ण केलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांने आपले नाव मतदार यादीत समाविष्ट करून घ्यावे व एक जागरूक नागरिक म्हणून मतदानाचा मिळालेला हक्क प्रामाणिकपणे बजवावा असे मार्गदर्शन केले. वयाची 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांची नव मतदार म्हणून नोंदणी करण्यात आली.

                हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता प्रफुल मुसळे, संतोष चौधरी,शालिक कांबळे ननिता बुरान व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये