ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

श्री बालाजी महाराज यात्रा नियोजन सभेत विविध विषयावर चर्चा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

ऐतिहासिक बालाजी महाराज यात्रा महोत्सव च्या पार्श्वभूमीवर यात्रा समिती ची सभा नगर परिषद सभागृहात उपविभागीय अधिकारी प्रा संजय खडसे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली,

यावेळी विविध विषयावर चर्चा करण्यात आली, याप्रसंगी बालाजी महाराज संस्थान चे विश्वस्थ राजे विजयसिंह राजे जाधव यांनी प्रास्ताविक भाषणात आजपावेतो यात्रेच्या निमित्ताने केलेल्या पुर्व तयारीची माहिती दिली, दुष्काळी परिस्थितीत यात्रा महोत्सव मध्ये येणारे व्यापारी, शेतकरी, आणि भाविकांना दिलास देणाऱ्या सुविधांचे नियोजन करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले, अल्पदरात भोजन, पाणपोई, आणि पशुधनसाठी चारा वाटप करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले, तसेच यात्रेकरू साठी बस स्थानक ते मंदिर पावेतो अल्पदरात इलेक्ट्रिक वाहन सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले, यात्रेच्या दरम्यान शांतता व सुव्यवस्था साठी पोलिस कंट्रोल रूम व, यात्रा मार्गदर्शन केंद्र, सुरु करण्यात येणार असल्याचे सांगितले याप्रसंगी सतीश कायंदे, नगराध्यक्षा माधुरी शिंपणे, मुख्याधिकारी अरुण मोकळ , उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन ठोसर, तहसीलदार वैशाली डोंगरजाळ, पोलीस निरीक्षक ब्रह्म गिरी, नगरसेवक, विविध विभागाचे अधिकारी, प्रतिष्ठित नागरिक व पत्रकार उपस्थित होते,

या सभेत पत्रकार अर्जुनकुमार आंधळे, गोविंदराव झोरे, जम्मन , विष्णु रामाणे, व्यवहारे, गिरीश वाघमारे, सूरज हनुमंते , नवनाथ गोमधरे यांनी यात्रेच्या संदर्भात विविध मुद्दे मांडले, त्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली,

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये