सिंधी येथे दिवं. आनंदाबाई ढुमणे स्मृती प्रबोधनपर कार्यक्रम तथा ग्रामगीता वितरण संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
राष्ट्रसंत विचार साहित्य परिषद, श्रीगुरुदेव सेवा मंडळाच्या संयुक्त विद्यमाने आणि ढूमणे परिवाराच्या सहकार्याने सिंधी (नलफडी) येथे ग्रामगीता प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दिवं. आनंदाबाई ढुमणे स्मृती प्रित्यर्थ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विरचित ग्रामगीता ग्रंथाचे वितरण याप्रसंगी करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाध्यक्ष म्हणून ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून माजी आमदार ॲड वामनराव चटप, केंद्रीय प्रचारक ॲड.राजेंद्र जेनेकर, राष्ट्रसंत विचार साहित्य परिषदेचे डॉ.श्रावण बानासूरे, श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे तालुका सेवाधिकारी लटारु मत्ते, ग्रामगीता परिक्षाप्रमुख सुभाष पावडे, राष्ट्रसंत निबंधस्पर्धा प्रमुख उमेश कडू, नगरसेवाधिकारी बळीराम बोबडे,प्रसिद्धीप्रमुख अविनाश ठाकरे, नरेंद्र मोहारे,सुभाषराव ढुमणे, विनोदराव ढुमणे,माजी उपसभापती मारोती लोहे,गोविंदा काळे,भास्कर देवाळकर,तुळशीराम धानोरकर आदींची उपस्थिती होती.
सुरूवातीला श्री.बळीराम बोबडे यांनी ग्रामगीतेतील अध्याय अंत्यसंस्काराचे वाचन केले. प्रास्तविक ॲड. राजेंद्र जेनेकर यांनी केले तर ॲड. सारिका जेनेकर, उमेश कडू, सुभाष पावडे, लटारु मत्ते आदींनी श्रीगुरुदेव सेवा मंडळाच्या तत्वप्रणाली संबंधी समयोचित विचार व्यक्त केले. जीवनात कर्मयोग आणि सदाचारभक्ती साधली गेली पाहिजे.जीवनात प्रगती करायची असेल तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी दिलेल्या विचारांची कास धरावी लागेल, असे प्रतिपादन ॲड. वामनराव चटप यांनी केले. जीवनात संत वचनाचा आसरा घेत आपण शुध्द जीवनाकडे वाटचाल केली तर आत्म्याची अमर्याद अशा अमर शक्तीचा अनुभव घेतो येतो, असे विचार यावेळी ग्राम. बंडोपंत बोढेकर यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन सौ. प्रिती ढुमणे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. श्रावण बानासुरे यांनी केले. दिवं. आनंदाबाई ढुमणे यांच्या स्मरणार्थ मारोती लोहे, गोविंदा काळे, भास्कर देवाळकर, खुशाब बोबाटे, कमलाकर धानोरकर , माधव कुचनकर, प्रभाकर पिदूरकर, नानाजी धानोरकर, मुरलीधर मोरे, सत्यपाल साळवे, सुनील दिवसे, दादाजी साळवे, मनोहर हिंगाणे, जीवनदास आमने, नागेश कपाळे, सुधाकर बोबडे,विनायक जेनेकर, घनश्याम गिरसावळे आदींना ग्रामगीता वितरण करण्यात आल्यात . राष्ट्रवंदना गायनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.



