ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

तेलंगणात राष्ट्रसंत साहित्य विचारकृती संमेलन: राष्ट्रसंत साहित्य हे सामुहिक आध्यात्मिक जागृतीतेतून ग्रामीण विकासाला चालना देणारे ज्ञानभांडार – एड. पारोमिता गोस्वामी 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

       राष्ट्रसंत विचार साहित्य परिषद केंद्रीय समिती आणि तेलंगण स्टेट मधील श्रीगुरुदेव सेवा मंडळ गोयेगाव, निशानी, सावरखेडा, खैरी,सांगवी इत्यादी शाखांच्या संयुक्त विद्यमाने गोयेगाव ( मंडल -केरामेरी), जि‌.आसिफाबाद (तेलंगण स्टेट) येथे २० व्या आंतरराज्य राष्ट्रसंत साहित्य विचारकृती संमेलनाचे आयोजित करण्यात आले होते. शनिवार दि. ७ फेब्रुवारी ८ रोजी ला गोयेगाव च्या फुलाजी बाबा साहित्य नगरीत साहित्य अभ्यासक, लेखक, ग्रामस्थ,सेवा मंडळाचे पदाधिकारी, युवक , महिला मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.

    एड. पारोमिता गोस्वामी

संमेलनाध्यक्षपदी होत्या. संमेलनाचे उद्घाटन MLA लक्ष्मी कोवा यांच्या हस्ते झाले. अ.भा. श्री गुरुदेव सेवा मंडळाचे प्रचार प्रमुख गोपालराव कडू, माजी झेडपी टीसी अब्दुल कलाम (केरामेरी) , ज्येष्ठ साहित्यिक ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर, माजी स्वागताध्यक्ष प्रभाकर नवघरे , चिटणीस एड. राजेंद्र जेनेकर , फिल्म निर्माता अनुप श्रीरामे , सरपंच आनंदराव आत्राम, स्वागताध्यक्ष रमेश सोनुले, स्वागतोपाध्यक्ष येमाजी गाऊत्रे उपस्थित होते.

   संमेलनाच्या अध्यक्ष एड. गोस्वामी म्हणाल्या, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे समग्र साहित्य ग्रामपरिवर्तन करणारे असल्याने आजच्या काळात हे त्यांचे विचार गावोगावी गेले पाहिजे. आपले गाव स्वयंपूर्ण झाले तर राष्ट्र आपोआप सक्षम होईल. आमच्या मुल च्या श्रमिक एल्गार संघटनेची प्रेरणा राष्ट्रसंताचे साहित्यच होते असे एड. गोस्वामी म्हणाल्यात.

    यावेळी आम. लक्ष्मी कोवा म्हणाले, सद्गुरू फुलाजी बाबा यांनी या भागात आध्यात्मिक विचार जनतेला दिले आहे. राष्ट्रसंतांच्या साहित्यातून विचारांतून आज गावलोक प्रेरणा घेऊन व्यसनमुक्त व आदर्श जीवन जगत सन्मार्गाला लागत आहे, हे पाहून मला आनंद वाटतो. आमदार फंडातून ३० लक्ष रूपयांचे सामाजिक भवन या गाव परिसरात करण्यात येईल, असे आश्वासन दिले. प्रचार प्रमुख गोपाल कडू म्हणाले,राष्ट्रसंतांचे साहित्य समाज जागृतीचे, ग्रामउद्धाराचे प्रेरणा स्रोत आहे.

त्यांचे जीवन हे कर्म, करुणा आणि क्रांतीने व्याप्त होते. ते ख-या अर्थाने महान साहित्यिक व समाजशिल्पकार होते, असे ते म्हणाले. ग्राम. बोढेकर म्हणाले, समाजबदलाचे प्रभावी साधन म्हणजे  महाराजांचे साहित्य आहे.

 राष्ट्रसंतांचे साहित्य शेतात राबणाऱ्या हातांसाठी आणि श्रमाला प्रतिष्ठा देणाऱ्या समाजासाठी आहे.

आज आपण ग्रामीण विकास, स्थानिक स्वराज्य, आत्मनिर्भर भारत याबद्दल ऐकतो, पण ही संकल्पना राष्ट्रसंतानी यापूर्वीच साहित्यातून मांडली आहे. त्यांच्या साहित्यातून , मानवतावादी तत्त्वज्ञान , राष्ट्रनिर्मिती ची प्रेरणा मिळते, असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक येमाजी गाऊत्रे यांनी केले.तर आभार प्रदर्शन विलास उगे यांनी केले.

—–

आकर्षक ठरली राष्ट्रसंत साहित्य दिंडी

—–

तेलंगणा प्रांतात झालेल्या या संमेलनात मोठ्या प्रमाणात मराठी आणि तेलुगू भाषिक अभ्यासक, साहित्य लेखक सहभागी झाले होते .राष्ट्रसंत साहित्य दिंडीत ग्रामगीता, भारतीय संविधान, भगवत गीता , तुकाराम गाथा, फुलाजी बाबा ग्रंथ , बायबल , कुराण आदी ग्रंथ ठेवण्यात आले होते. या साहित्य दिंडीत स्थानिक सामाजिक कार्यकर्ते शंकर आदे, रामदास मोहुर्ले,पोशट्टी मोहुर्ले , रमेश गुरनुले, भिकू नागोसे, मोतीराम नागोसे, पांडुरंग शेंडे, ,नामदेव कुळसंगे, सोमा सोनुले, गोविंदराव शेंडे, वामन मोहुर्ले,चंद्रकला पारडी, पार्वता आदे, तुळसा गुरनुले,लीला आदे, शामला मोहुर्ले, प्रेमला आदे, विजय मंडाळे, देवराव आत्राम, चंद्रभान तोडसाम आदी मान्यवर सहभागी झाले होते.

     संमेलनाच्या पहिल्या परिसंवादात ‘आजच्या युगाची संजीवनी बुटी -ग्रामगीता’ या ग्रंथात डॉ. श्रावण बाणासुरे यांनी प्रचार महिमा , डॉ .धर्मा गावंडे यांनी प्रयत्न प्रभाव,एड. सारिका जेणेकर यांनी महिलोन्नती आणि प्रा. नामदेव मोरे यांनी जीवन शिक्षण विषयावर आपले अभ्यासपूर्ण विचार मांडले. अध्यक्षस्थानी श्रीकांत धोटे (अमरावती)होते. सूत्रसंचालन सुभाष पावडे यांनी केले तर ग्राम.सुखदेव चौथाले यांनी आभार मानले.

     सामुदायिक प्रार्थनेवर राजुरा तालुका सेवाधिकारी लटारू मत्ते यांनी चिंतन प्रस्तुत केले . सामाजिक कार्य व साहित्य निर्मिती क्षेत्रात योगदान देणाऱ्या व्यक्तींना याप्रसंगी सहा

चैतन्य व २४ विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सकाळच्या सामुदायिक ध्यानावर शंकर दरेकर यांनी विचार व्यक्त केले तर योग प्राणायाम वर योगतज्ञ विनायक साळवे, ग्राम. नामदेव पिज्दूरकर, गणेश मांडवकर यांनी मार्गदर्शन केले.

समारोपीय कार्यक्रम पटनापुर सिद्धेश्वर संस्थांचे अध्यक्ष केशवदादा इंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी साहित्य प्रचारक अर्जुन पारुडकर(लातूर), सामाजिक नेते सुकुमार पेटकुले, कोटनाका विजय , आत्राम सुगुना, वाढई बाबुराव आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये