पोंभुर्णा पोलिसांची कारवाई, पाच आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. विजय वासेकर
कत्तलीच्या उद्देशाने निर्दयतेने गोवंशीय जनावरांची वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध पोंभुर्णा पोलिसांनी मोठी कारवाई करत 1४ गोवंशीय बैल जप्त केले आहेत. या प्रकरणी पाच आरोपींविरुद्ध विविध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिनांक ६ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री सुमारे ११ वाजताच्या सुमारास, पोलीस स्टेशन पोंभुर्णा हद्दीत समोरील/राहुल ठेंगणे यांच्या खबरीवरून ही कारवाई करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार काही इसम गोवंशीय बैलांना कोणतीही चारा-पाणी व्यवस्था न करता, निर्दयपणे कोंबून कत्तलीच्या उद्देशाने वाहतूक करत होते.
कारवाईदरम्यान पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपास केला असता, 1४ गोवंशीय बैल अत्यंत हालअपेष्टेत आढळून आले. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत सदर जनावरे ताब्यात घेतली. जप्त करण्यात आलेल्या जनावरांची अंदाजे किंमत ३ लाख ९० हजार रुपये इतकी आहे. ही जनावरे पुढील सुरक्षेसाठी पशु फाउंडेशन, चंद्रपूर येथे जमा करण्यात आली आहेत.
या प्रकरणी
१) विश्वनाथ धोंडीराम अर्जुनीकार (वय ४४)
२) पन्नू भूकन बडट (वय ६५)
३) भोजराज कडू चव्हाण (वय ४५)
४) विशाल महादेव चिंचाळकर (वय ३०)
५) बंडू यादव अर्जुनीकार (वय ४८, रा. फुलगाव, ता. पोंभुर्णा)
यांच्याविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा, प्राणी छळ प्रतिबंधक कायदा तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक चंद्रपूर, अप्पर पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस स्टेशन पोंभुर्णा येथील अधिकाऱ्यांनी केली. पुढील तपास पोंभुर्णा पोलीस करीत आहेत.



