पंचशील बुद्ध विहारासह तालुक्यात विविध ठिकाणी त्यागमूर्ती माता रमाई जयंती

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे
जिवती :- त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांची जयंती जिवती येथील पंचशील बुद्ध विहारासह येल्लापुर, पूनागुडा व माराई पाटण येथे रमाबाई महिला मंडळ व भारतीय बौद्ध महासभाच्या वतीने विविध कार्यक्रम घेत मोठ्या उत्साहात साजरी झाली.
कार्यक्रमाची सुरुवात सर्व ठिकाणी तथागत भगवान गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व माता रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी माता रमाई आंबेडकर यांच्या त्यागमय, संघर्षपूर्ण व प्रेरणादायी जीवनप्रवासावर सखोल प्रकाश टाकत, आजच्या पिढीने त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प करण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांनीही आपल्या मनोगतातून माता रमाईंबद्दलचा आदर व कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाच्या शेवटी सामूहिक त्रिशरण घेऊन सामाजिक समता, बंधुता व करुणेचा संदेश देत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. विशेष म्हणजे या सर्व कार्यक्रमांमध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय व प्रेरणादायी ठरला.
पंचशील बुद्ध विहारातील कार्यक्रमास रमाबाई महिला मंडळ व भारतीय बौद्ध महासभेच्या जयमाला कांबळे, वैशाली वाठोरे, अश्विनी रोकडे, विशाखा भगत, निता मोहिते, संगमा पाटील, दुर्गे ताई, पायल कुकडे, व्यंकटी कांबळे, दिपक साबने, शरद वाठोरे, चंदू रोकडे, गिरीश कांबळे, संकेत भगत, निलेश पाटील, कैलास मोहिते यांच्यासह अनेक पदाधिकारी, महिला, युवक उपस्थित होते.



