पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते सेलू तालुक्यातील विविध कामाचे लोकार्पण व भूमीपूजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
वर्धा : पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांच्या हस्ते आज सेलू तालुक्यातील आमगाव (ख) ते गणेशपूर खापरी (ढोणे) येथील 30 लक्ष रुपयाच्या खडीकरण रस्ता बांधकाम, हिंगणी येथील आपले सरकार सेवा केंद्र, पांदन रस्ता, पुलाचे बांधकाम, नाली बांधकामाचे भूमीपूजन तसेच घनकचरा व्यवस्थापन अशा 1 कोटी 37 लक्ष रुपये व येळाकेळी येथील 40 लक्ष रुपयाच्या रस्ता बांधकामाचे भूमीपूजन व महिला बचत गट भवनाचे लोकार्पण करण्यात आले.
विविध कामाच्या भूमीपूजन व लोकार्पण कार्यक्रमाचे खडकी येथील हनुमान देवस्थान येथे सभागृहात आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी आमदार सुधाकर कोहळे, तहसिलदार शंकुतला पाराजे, अशेाक मुडे, अशोक कलोडे, प्रफुल खोडे, आमगावचे सरपंच राजेश लोणकर, हिंगणीच्या सरपंच दामिनी डेकाटे, ज्योती घंगारे आदी उपस्थित होते.
यावेळी डॉ. पंकज भोयर म्हणाले, हिंगणी या छोट्या ग्रामपंचायतींनी व्यवस्थित नियोजन करुन घनकचरा व्यवस्थापन केले, ही ग्रामपंचायतींसाठी अभिमानाची बाब आहे. हिंगणी येथे नव्याने बांधण्यात आलेली प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत जिल्ह्यातच नव्हे तर विदर्भातील सुसज्ज इमारत असल्याचे सांगून येथे येणाऱ्या रुग्णांसाठी अत्याधुनिक शस्त्रक्रिया कक्षाची निर्मिती करण्यासाठी प्रयत्न करणार. लवकरच सिंदी ड्रायपोर्ट तयार होणार असून या ड्रायपोर्ट मध्ये पदवीधरांना नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. यासाठी सेलू तालुक्यातील पदवीधरांनी पदवीधर मतदारसंघाच्या मतदार यादीत नाव नोंदणी करुन घ्यावी, असे आवाहन पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी केले.
वर्धा जिल्ह्यात 20 कोटी रुपये खर्च करुन उमेद मॉल तयार करण्यासाठी शासनाने मंजूरी दिली असून भविष्यात यामध्ये वाढ करुन 50 कोटी रुपये मंजूर करण्यासाठी प्रयत्न करणार. यामुळे जिल्ह्यातील बचत गटाच्या उत्पादित मालाला बाजारपेठ मिळून गटातील महिला सक्षम होण्यास मदत होईल, असेही पुढे बोलतांना डॉ. पंकज भोयर म्हणाले.
माजी आमदार सुधाकर कोहळे म्हणाले, नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या मतदार नोंदणीमध्ये वर्धा जिल्ह्यातील नोंदणी कमी असून यासाठी जिल्ह्यातील पदवीधरांनी मतदार यादीत नाव नोंदणी करण्यासाठी अर्ज भरुन घ्यावे, असे आवाहन केले. येळाकेळी येथील रस्त्याच्या भूमीपुजन व बचतगट भवन कार्यक्रमास येळाकेळीच्या सरपंच भारती चलाख, उमरीचे सरपंच सचिन खोसे, सयाजी महाराज, सोनाली कलोडे आदी उपस्थित होते.



