ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

निराधार लाभार्थ्यांना नियमित मानधन देण्यात यावे

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

कोरपना – तालुक्यातील संजय गांधी निराधार योजना अंतर्गत लाभार्थ्यांना नियमित मानधन द्यावे या मागणीचे निवेदन तहसीलदार कोरपना यांना कोरपना पंचायत समितीचे माजी सभापती संजय मुसळे यांच्या नेतृत्वात लाभार्थ्यांच्या उपस्थितीत देण्यात आले.

शासनातर्फे संजय गांधी निराधार योजना निराधार व्यक्तींसाठी चालवली जाते. या योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना मानधन दिले जाते. परंतु हे मानधन नियमित मिळत नसल्याने लाभार्थ्यांना विविध अडचणीचा सामना करावा लागतो आहे. दर महिन्याला नियमित मानधन देणे क्रमप्राप्त असताना नेहमीच मानधन देण्यास विलंब होतो आहे. परिणामी गरजू लाभार्थ्यांना आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी ताटकळतं राहावे लागत आहे.

या लाभार्थ्यांना नियमित मानधन मिळाले पाहिजे यासाठी तहसीलदारांनी निवेदन देण्यात आले. याप्रसंगी किशोर बावणे, शशिकांत आडकिने, पुरुषोत्तम भोंगळे, अमोल आसेकर, वसंता बहरे व मोठ्या संख्येने लाभार्थी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये