श्रीपत राठोड राज्यस्तरीय कृषी गौरव पुरस्काराने सन्मानित

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
उमरखेड जि. यवतमाळ येथे भाऊसाहेब माने कृषी प्रतिष्ठान उमरखेड व डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ ,अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या राज्यातील मान्यवरांचा सत्कार सोहळा संपन्न झाला.
राज्यातील कृषी क्षेत्र प्रगत व अद्यावत तंत्रज्ञानाशी जोडल्या जाऊन राज्यातील अल्पभुधारक व मध्यम शेतकरी आर्थिक दृष्ट्या सक्षम बनण्यासाठी त्याला शेतीशी निगडीत विविध जोड व लघु – उद्योगधंदे उभारून त्यामध्ये नेत्रदिपक यश मिळवून संपुर्ण राज्याचे लक्ष वेधुन घेणाऱ्या बावीस कृषी रत्नाचा गौरव सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत नुकताच संपन्न झाला.
हा राज्यस्तरीय कृषी गौरव पुरस्कार सोहळा कृषी महाविद्यालय कुपटी , ता.उमरखेड जिल्हा यवतमाळ येथे डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ,अकोला येथील कुलगुरु मा.डॉ.शरद गडाख यांच्या अध्यक्षतेखाली व हिंगोलीचे खासदार मा.नागेश पाटील, आष्टीकर, उमरखेडचे विद्यमान आमदार मा. किसन वानखेडे ,प्रसिद्ध व्याख्याते मा.गणेश शिंदे आणि इतर विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत यशस्वीपणे संपन्न झाला.
या गौरव सोहळ्यात जाहूर तांडा येथील मूळ रहिवाशी व सध्या नागपूर येथे वास्तव्यास असलेले सामाजिक कार्यकर्ते श्री श्रीपत व्यंकटराव राठोड यांना शहरी भागात टेरेस गार्डनिंगद्वारा (गच्चीवरील सेंद्रीय भाजीपाला लागवड) सेंद्रिय खतांचा वापर करून भाजीपाला व फल उत्पादन आणि शेतकरी चळवळीतील योगदानाबद्दल,कृषि क्षेत्रातील उल्लेखनिय कामगिरीबाबत त्यांचा सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी श्री श्रीपत राठोड यांनी चा विचार मंचावरून आपण केलेल्या उत्तम कामगिरीची यशोगाथा प्रभावी शब्दात मांडून त्यांच्या स्वरचित कवितेचे सादरीकरणातून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.या कार्यक्रमासाठी मुद्दाम आलेले जन्मगावातील व शिक्षक चळवळीतील नेते मा.चंदकांत दामेकर,जाहूर,सामाजिक क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणारे सेवानिवृत्त मुख्याध्यापक मा. विठ्ठलराव इंगळे,बिल्लाळी यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्याकडूनही राठोड दांपत्याचा सत्कार करण्यात आला. विशेष पुसद तालुक्यातील सामाजिक कार्याला वाहून घेतलेले जेष्ठ कार्यकर्ते रामराव चव्हाणही या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित होते. कार्यक्रमाचे मुख्य संकल्पक भाऊसाहेब माने कृषी प्रतिष्ठान, उमरखेडचे चेअरमन मा.डॉ.विजय माने यांच्या कल्पक नियोजन आणि
महाविद्यालयाचे प्राचार्य मा. वानखेडे आणि चमूच्या अथक परिश्रमातून एक ऐतिहासिक कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला.



