ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कृषी महाविद्यालय, खिर्डी येथे माजी आमदार सुभाष धोटेंच्या हस्ते ध्वजारोहण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

 इन्फंट जिजस सोसायटी राजुरा द्वारा संचालित डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला संलग्नित कृषी महाविद्यालय खिर्डी (गडचांदूर) ता. कोरपना जि. चंद्रपूर येथे ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार मा. श्री. सुभाषभाऊ धोटे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना श्री. धोटे म्हणाले की, भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अथक परिश्रमातुन निर्माण झालेले भारतीय संविधान जगात सर्वश्रेष्ठ असून संविधानिक मूल्यांची जपनुक करीत सर्वोत्तम शिक्षण व कठोर परिश्रम घेऊन आयुष्यात यशस्वी होण्यासाठी प्रत्येकांनी प्रयत्न करावे असे आवाहन केले.

         यावेळी जनजागृती शिक्षण प्रसारक मंडळ चे अध्यक्ष पंकज पवार, बालाजी पवार, प्राचार्य दत्ता जाधव, बालाजी पवार, गजानन तोरे, अलोने सर, डी. एम. पवार सर, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी तोरे, प्राध्यापक कल्याणी सोनवणे, श्रीजा अण्णाला, विकास बोरकुटे, गजानन ठाकरे, यासह महाविद्यालयाचे प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक वर्ग आणि विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये