ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चालबर्डी (रै) येथे राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे उद्घाटन संपन्न

निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालयाचा उपक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

     भद्रावती स्थानिक निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिराचे उद्घाटन जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा चालबर्डी ( रै )येथे संपन्न झाले.

या शिबिराच्या उद्घाटनिय कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. एल. एस. लडके, उद्घाटक, माननीय डॉक्टर विवेक शिंदे, अध्यक्ष, भद्रावती शिक्षण संस्था, भद्रावती, विशेष अतिथी सौ प्रियांका सोयाम सरपंच चालबर्डी, प्रमुख अतिथी, श्री गणेश नागपुरे उपसरपंच चालबर्डी, कु. जयाकुमारी चंदनखेडे, ग्रामसेवक , श्री देवबाबा परसे, पोलीस पाटील चालबर्डी, सौ सुनंदा सोयाम, उपाध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती, श्री कमलाकर मेश्राम, वरिष्ठ शिक्षक , श्री झाडे सर, श्री.मनोज मेश्राम,आरोग्य अधिकारी व राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी, डॉ. कुलदीप भोंगळे उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात थोर पुरुषांच्या प्रतिमेला माल्या अर्पण करून व उपस्थित सर्व मान्यवरांच्या स्वागताने झाली.

सर्वप्रथम राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. कुलदीप भोंगळे यांनी आपल्या प्रास्ताविकेतून राष्ट्रासाठी युवकांचे योगदान या संकल्पनेवर आधारित या शिबिराचा आयोजनामागचा मुख्य उद्देश काय आहे हे स्पष्ट केले.

या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय डॉक्टर विवेक शिंदे, अध्यक्ष, भद्रावती शिक्षण संस्था, भद्रावती यांनी शिबिराचे रीतसर उद्घाटन करून आपल्या उद्घाटनिय भाषणातून सांगितले की ग्रामीण जीवनाची ओळख व्हावी यासाठी या शिबिराचे आयोजन केले आहे. तसेच खेडेगाव हा देशाचा आरसा असतो. विद्यार्थ्यांनी ग्रामीण भागात जाऊन आपले विचार मांडत जावे. आपल्याला भेडसावणाऱ्या प्रश्नांची उत्तरे शोधत जा. नेहमी जिज्ञासू वृत्ती ठेवावी असे मोलाचे मार्गदर्शन केले.

 या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सौ. प्रियंका सोयाम, सरपंच, चालबर्डी यांनी विद्यार्थ्यांमध्ये काहीतरी कला गुण असणे आवश्यक आहे त्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहावे असे आवाहन करीत सरपंच या नात्याने सर्वस्वी मदत करण्याचे आश्वासन दिले.

यावेळी विशेष अतिथी श्री गणेश नागपुरे, उपसरपंच चालबर्डी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत माणूस हा किती मोठा झाला तरी तो आयुष्यभर विद्यार्थीच असतो त्याने सतत काहीतरी नवीन शिकण्याची आवड ठेवावी. डिजिटल युगामध्ये आपल्याला पुस्तकी ज्ञान मिळते परंतु समाजात कसे राहावे हे मिळत नाही असे मार्गदर्शन केले. श्री. देवबाबा परसे, पोलीस पाटील यांनी यांनी सांगितले की आपल्या देशात थोर महापुरुषांचा वारसा लाभला असून त्यांच्या कार्याचा आदर्श समोर ठेवून राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी भरीव मोलाचे कार्य करावे असे सांगितले.

 या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एल. एस. लडके यांनी शिबिरातील विद्यार्थ्यांना खेडेगावातील समस्या समजून घ्याव्या व त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावे. अशा प्रकारच्या शिबिरामुळे आपल्याला चांगल्या सवयी लागतात की ज्यामुळे आपण जीवनात पुढे जाण्यास व स्वावलंबी बनण्यासाठी उपयोग होतो असे आपले मत व्यक्त केले.

या उद्घाटन कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्राध्यापक सौ. अपर्णा धोटे, प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना, कार्यक्रम अधिकारी, प्रा. कुलदीप भोंगळे तर आभार प्रदर्शन प्रा. संदीप प्रधान यांनी केले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता प्रा. प्रतीक नन्नवरे, श्री पांडुरंग आखतकर, रागिनी निखाडे, प्रथमेश वाढई, साजिद शेख, यांनी अथक परिश्रम घेतले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये