ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

संजय गांधी निराधार योजना पासून अनेक लाभार्थी वंचित 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

महाराष्ट्र सरकारने अंध, अपंग, व्यक्तींना अर्थ सहाय्य मिळावे या करीता संजय गांधी निराधार योजना सुरू केली आहे, अनेक लाभार्थी या योजनेचा लाभ घेत आहे, मात्र अनेक पात्र लाभार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही, गेल्या काही महिन्यांपासून संजय गांधी निराधार योजनेची सभा न घेतल्याने अनेक लाभार्थीला या योजनेपासून वंचित रहावे लागत आहे, पात्र लाभार्थी यांनी ऑन लाइन फॉर्म भरले आहे, अनेक महिन्यापासून अंध अपंग व्यक्तीं तहसील कार्यालयात चकरा मारत आहे, संबंधित विभागाकडून एकच उत्तर दिले जात आहे.

की संजय गांधी निराधार योजना ची मीटिंग न झाल्याने प्रस्ताव मंजूर करण्यात आले नाही, तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांनी या प्रकरणी लक्ष वेधून लवकरात लवकर संजय गांधी निराधार योजनेची मिटिंग घेऊन प्रलंबित असलेल्या लाभार्थी चे प्रस्ताव मंजूर करून शासकीय अनुदान सुरु करण्यात यावे अशी मागणी लाभार्थी करीत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये