दारू पिवुन वाहन चालविणा-या चालकांवर कार्यवाही

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
दिनांक 04/03/2026 रोजी वाहतुक नियंत्रण शाखा, वर्धा येथील 2 हि मार्शल अंमलदार यांनी मा. पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल सर यांच्या आदेशानुसार पोलीस अमलदार सफी संजय भांडेकर ब.क 1012. पोहया शब्बीर सैयद ब.क 814, पोशि दिलीप कामडी 163. पोशि प्रदीप कोवळे ब.क 983 यांनी वर्धा शहरात पेट्रोलींग करून वाहने चेकींग केली असतांना सदर वाहन बालक हे आपले वाहन झिकॉक पध्दतीने चालवितांना मिळुन आल्याने सदर वाहन चालक नागे 1) मुन्ना शंकर गवई रा. धोत्रा त.कळंब जि यवतमाळ (2) गजानन शंकरराव वाघाडे रा. बारेगाव मेधे वर्षा हे दोघेही दारू पिवुन असल्याचा संशय आल्याने सदर वाहन चालकास वाहतुक नियंत्रण शाखा, वर्धा येथील आणुन त्यांचे ब्रिथ अॅनालाईझर ने दारू पिवुन असल्याचे चेक केले असता त्यांचे रक्ता मध्ये अलकहोलचे प्रमाण मिळुन आले त्यांचेवर 185 मोवाका अन्वये पोलीस स्टेशन वर्धा शहर येथे गुन्हा नोंद करण्यात आला. तसेच त्यांचे गाडीचे कागदपत्र चेक केले असता गाडी क. MH 32 AB 9210 तसेच गाडी क MH 32 AC 0964. या दोन्ही गाडयानंवर वाहन निलंबन प्रस्तावाची कारवाई करून RTO वर्धा यांना पाठविण्यात आली आहे. व वाहने पोलीस स्टेशन वर्धा शहर येथे जप्त करण्यात आली आहे.
पो.नी. विलास पाटील वाहतूक नियंत्रण शाखा, वर्धा यांनी दारू पिवुन वाहन चालवु नये असे सर्वाना नागरीकांना आव्हान केले आहे.


