ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महिलादिनी ब्रम्हपुरीत राज्यस्तरीय कविसंमेलन आणि नारीशक्ती पुरस्कार वितरण सोहळा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार

ब्रम्हपुरी :- झाडीबोली साहित्य मंडळ, चंद्रपूर शाखा–ब्रम्हपुरी यांच्या सौजन्याने दि.८मार्च २०२६ रोजी सकाळी १०.००वा.नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयात स्व.हिरालालजी भैया सभागृहात भव्य राज्यस्तरीय कविसंमेलन व नारीशक्ती पुरस्कार वितरण समारंभ आयोजित करण्यात आले आहे.याच कार्यक्रमात झाडीबोली प्रीमियर लीग अंतर्गत घेण्यात आलेल्या ऑनलाईन साहित्य लेखन स्पर्धेतील विजेत्यांचा बक्षीस वितरण सोहळा पार पडणार असून सुमारे दोन महिने चाललेल्या या स्पर्धेतून १४ विजेते घोषित करण्यात आले त्यांचा गौरव करण्यात येणार आहे.तसेच जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सात महिलांना ‘नारीशक्ती पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

   या कार्यक्रमाचे उद् घाटन नेवजाबाई भैया हितकारिणी शिक्षण संस्थेचे सचिव मा. अशोक भैया यांच्या हस्ते होणार असून केंद्रीत समिती सदस्य ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर अध्यक्षस्थानी राहणार आहेत. कविसंमेलनाध्यक्षपदी प्रा.विनायक धानोरकर असतील.प्रमुख अतिथी म्हणून ब्रम्हपुरीचे नगराध्यक्ष मा.योगेश मिसार,उपाध्यक्ष मा.नितीन उराडे तसेच झाडीबोली साहित्य मंडळ चंद्रपूरचे अध्यक्ष मा. अरुण झगडकर उपस्थित राहणार असून यांच्यासह ने.ही. महाविद्यालयाचे मराठी विभागप्रमुख व ३३ व्या झाडीबोली साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कवी, लेखक डॉ.धनराज खानोरकर यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे.तसेच कार्यक्रमाला बोलीमहर्षी डॉ हरिश्चंद्र बोरकर,डॉ संजय निंबेकर, किरण गजपूर, ठाणेदार प्रमोद बानबले, प्राचार्य डॉ एन एस कोकोडे, प्राचार्य डॉ नरेंद्र आरेकर, गणेश कुंभारेंची उपस्थिती असेल.नारीशक्ती पुरस्कारासाठी प्रा.रत्नमाला भोयर,अर्चना खंडाते (माजी नगरसेविका, ब्रम्हपुरी), डॉ. विद्या शेळके, गटशिक्षणाधिकारी,सविता धमगाये,समाजसेविका व साहित्यिक कल्पना गेडाम, विचारवंत व लेखिका उज्वला उसेंडी तसेच कवयित्री किरण चौधरी यांची निवड करण्यात आली आहे.

 या कार्यक्रमात चंद्रपूर, गोंदिया,गडचिरोली,भंडारा तसेच पुणे,अमरावती,वर्धा छ.सं.नगर आदी जिल्ह्यांतील कवी व साहित्यिक सहभागी होणार असून रसिकांना कविसंमेलनाची मेजवानी मिळणार आहे.तरी सर्व साहित्यिक,कवी व रसिकांनी उपस्थित राहावे,असे आवाहन शाखाध्यक्ष कवी संतोष मेश्राम व सचिव धनंजय पोटे यांनी केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये