ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

रंगपंचमी व होळी पार्श्वभूमीवर भद्रावती पोलिसांची विशेष मोहीम

४५ वाहनचालकांवर कारवाई, साडेचार लाखांचा दंड वसूल

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

      रंगपंचमी व होळीच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी भद्रावती पोलिसांनी विशेष तपासणी मोहीम राबवून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली. या मोहिमेत ड्रंक अ‍ॅन्ड ड्राईव्ह, तिहेरी सीट, वेगात वाहन चालविणे, अल्पवयीन चालक, विनापरवाना तसेच हेल्मेटशिवाय वाहन चालविणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला.

या कारवाईदरम्यान ड्रंक अ‍ॅन्ड ड्राईव्हच्या २५ केसेस नोंदविण्यात आल्या. तसेच हेल्मेटशिवाय व तिहेरी सीट वाहन चालविणाऱ्या २० जणांवर कारवाई करण्यात आली. अशा एकूण ४५ प्रकरणांमध्ये पोलिसांनी कारवाई करत संबंधितांकडून सुमारे ४ लाख ५० हजार रुपयांचा दंड वसूल केला.

ही मोहीम ठाणेदार योगेश्वर पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. या कारवाईत पोलीस हवालदार लेकेश नायडू, राकेश बंजारीवाले तसेच पोलीस अंमलदार अंकुश खंडाळे, नितेश गुढदे आणि सतीश कसारे यांनी सक्रिय सहभाग घेतला.

वाहतूक पोलिसांनी ‘स्टॉप ड्रंक अ‍ॅन्ड ड्राईव्ह’ मोहिमेअंतर्गत शहरातील प्रमुख चौकांमध्ये नाकाबंदी करून तपासणी केली. सणाच्या काळात नागरिकांनी नियमांचे पालन करून सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये