ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वर्धा पोलिसांचे ‘ऑपरेशन निशाणा’

४८ तासांत गुन्हेगारांवर मोठी कारवाई

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा, जिल्हा पोलीस दलाच्या वतीने गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी आणि कापदा व सुव्यवस्था अवाधित राखण्यासाठी ‘ऑपरेशन निशाणा’ राबविण्यात आले. दिनांक १६ जानेवारी २०२६ (सायंकाळी ६.०० वा.) ते १८ जानेवारी २०२६ (सायंकाळी ६.०० वा.) या ४८ तासांच्या कालावधीत संपूर्ण जिल्ह्यात राबविलेल्या या विशेष मोहिमेत फरार आरोपी, पाहिजे आरोपी, अजामीनपात्र वॉरंट असलेले आरोपी, कोर्टातून जमीन रह झालेले आरोपी, पो. स्टे ला दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यातिल आरोपी अटक करण्याकरिता तसेच पो. स्टे रेकॉर्ड वरील टॉप २० तिल दारू विक्रेते, शरीरविरुद्धचे, मालमत्तेचे गुन्हे करणारे आरोपी, NDPS गुण्यातील आरोपी आर्म अॅक्ट गुन्ह्यातिल आरोपी MPDA मधील मुटलेले आरोपी मागील दोन वर्षातिल हद्दपार आरोपी हिष्ट्रीशीटर आरोपी याना सरप्राइज चेक करण्याकरिता ही मोहीम राबविण्यात आली. ही मोहीम पोलिस अधीक्षक, अपर पोलिस अधीक्षक यांचे मार्गदर्शनात प्रत्येक पो. स्टे ला विशेष पथके तयार करण्यात आली तसेच वर्धा आर्वी, पुलगाव हिंगणघाट या चारही उपविभागातील अधिकारी व त्यांची विशेष पथके तसेच स्थानिक गुन्हे शाखाचे पथक व पोलिस अधीक्षक कार्यालयातील ४ विशेष पथके असे वेगवेगळे पथके तयार करूनयात एकूण ४५ अधिकारी व ४५० अंमलदार समाविष्ट करण्यात आले. सलग ४८ तास ही मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत खालील आकडेवारी प्रमाणे आरोपी चेक करण्यात आले.

प्रमुख कारवाई आणि आकडेवारी, पाहिजे फरार असलेले आरोपी (Wanted): जिल्हयातिल एकूण ४३ पाहिजे आरोपी व ४ फरार आरोपीचे ठिकाणी त्यांना चेक करण्यात आले.

एन.बी.डब्ल्यू. (NBW Non-Bailable Warrant): कोर्टातून अजामीनपात्र वॉरेट असलेल्या ३४ आरोपींना चेक करण्यात आले व १० आरोपींना अटक करण्यात आली.

गंभीर गुन्ह्यातील आरोपीः पो. स्टे. ला गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यात पाहिजे असलेल्या १४ आरोपींना चेक करण्यात आले व ३ आरोपी मिळून आल्याने त्यांना अटक करण्यात आली.

असे एकूण अटक करणारे ११६ आरोपींना चेक करण्यात आले आहे त्यापैकी १० आरोपींना अटक करण्यात आली आहे.

तसेच चेक करणाऱ्या आरोपीमध्ये दारू विक्रेते, शरीरविरुद्धचे, मालमत्तेचे गुन्हे करणाऱ्या ३६४ आरोपीना चेक करण्यात आले त्यापैकी २९० आरोपी मिळून आले.

NDPS गुण्यातील ९६ आरोपी चेक केले त्यापैकी ५७ आरोपी मिळून आले.

आर्म अॅक्ट गुन्ह्यातइल एकूण ११४ आरोपींना चेक करण्यात आले त्यापैकी ५० आरोपी मिळून आले.

MPDA मधील सुटलेले एकूण ३४ आरोपीना चेक करण्यात आले त्यापैकी २५ आरोपी मिळून आले.

मागील दोन वर्षातिल हद्दपार एकूण २२१ आरोपींना चेक करण्यात आले त्यापैकी १४६ आरोपी मिळून आले.

हिष्ट्रीशीटरः- एकूण ५७ आरोपींना चेक करण्यात आले त्यापैकी ३५ आरोपी मिळून आले.

असे एकूण चेक करणारे ८६६ आरोपींना चेक करण्यात आले आहे त्यापैकी ६०२ आरोपी मिळून आले व त्यापैकी २४ आरोपीतांवर कारवाई करण्यात आली.

सदर चे ऑपरेशन हे मा. पोलिस अधीक्षक वर्धा श्री मीरभकुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनात अपर पोलिस अधीक्षक वर्धा श्री सदाशिव वाघमारे यांच्या देखरेखीखाली तसेच वर्धा, हिंगणघाट, पुलगाव, आर्वी उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या कार्यालयातील चार पथके, स्थानिक गुन्हे शाखाचे दोन पथक तसेच पोलिस अधीक्षक कार्यालयातील या ४ विशेष पथक पांचा विशेष ऑपरेशन मध्ये सहभाग होता.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये