ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भद्रावती येथील संताजी गृहनिर्माण संस्थेत स्वयंघोषित अध्यक्षांचा अपहार

संस्थेच्या सभासदास विचारात न घेता परस्पर विकले भुखंड : पत्रकार परिषदेत संताजी नगर वाशीयांचा आरोप

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

        भद्रावती शहरात १९८० साली नियोजित संताजी नगर गृहनिर्माण संस्था उभारून सर्व्हे क्रमांक.१३१/३ शेतजमीन खरेदी करण्यात आलेली होती. गृहनिर्माण संस्थेच्या सभासदांना त्याठिकाणी प्लॉट उपलब्ध करून दिल्यानंतर गृहनिर्माण संस्थेची मालमत्ता म्हणून चिचोर्डी सर्व्हे क्रमांक १३१ बटे ३ मधील प्लॉट क्रमांक ८०,८१, ८२, ८३ व ८७, ८८ ८९ सात भुखंड शिल्लक ठेवण्यात आले होते. सभासद व अध्यक्षांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याने स्वयंघोषित लहानू शंकर बावणे या अध्यक्षांने गृहनिर्माण संस्थेचा सातबारा स्वतःच्या नावाने करून २० जुलै २०२४ मध्ये इतर सभासदांना अंधारात ठेवून अत्यल्प भावात गृहनिर्माण संस्थेच्या भूखंडाची परस्पर विक्री करून इतर सभासदांची फसवणूक केली असल्याचे पत्रकार परिषदेच्या माध्यमातून संताजी नगर वाशीयांनी असे स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे लहानु सखाराम बावणे या कथित अध्यक्षांचे अधिकार फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये काढण्यात आले होते. मात्र त्यांनी जुलै २०२४ मध्ये अधिकाराचा गैरवापर करीत नियोजित संताजी नगर गृहनिर्माण संस्थेच्या राखीव भूखंडाची परस्पर विक्री करून फार मोठा आर्थिक अपहार केला.

सबंधित खरेदीदार जेव्हा भुखंड मोजमाप करण्याकरिता मौक्यावर आले तेव्हा हा सर्व गैरप्रकार झाल्याचे कळले. सबंधित संताजी नगर गृहनिर्माण संस्थेच्या इतर सदस्यांनी झालेली फसगत लक्षात घेऊन तात्काळ पोलिस स्टेशन भद्रावती येथे या बेकायदेशीर व अवैध कृत्याची रीतसर तक्रार दाखल केली. स्थानिक नगर परिषद भद्रावती ने अश्या वादग्रस्त व अवैध विक्री करून दिलेल्या जागेवर कोणतेही बांधकाम करण्यास परवानगी देऊ नये अश्या आशयाचे लेखी निवेदन देण्यात आले आहे.

दिनांक.१७ रोजी संताजी सभागृहात पार पडलेल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांनी आपली कैफियत मांडली.

सबंधित कथित अध्यक्ष लहानु सखाराम बावणे यांच्या विरोधात नियोजित संताजी नगर गृहनिर्माण संस्थेच्या सदस्यांची दिशाभूल व फसवणूक करून फार मोठा आर्थिक घोटाळा केल्याबद्दल त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली. गृहनिर्माण संस्थेच्या अध्यक्षांनी विक्री प्रक्रिया राबविताना सबंधित सदस्य व इतर पदाधिकाऱ्यांना गृहीत धरून व ठराव पारित करून सबंधित मालमत्तेची विल्हेवाट लावणे अपेक्षित असताना या स्वयंघोषित कथित अध्यक्षाने एकतर्फी कारवाई केलेली आहे. सबंधित भुखंड विक्री व विक्रीतून आलेल्या रकमेवर सर्व गृहनिर्माण संस्थेच्या सदस्यांचा हक्क असतो. अशी कोणतीही खरेदी वा विक्री प्रक्रिया राबविताना सर्वानुमते निर्णय अपेक्षित असतो मात्र सर्व बाबींना तिलांजली देत हे सर्व सोपस्कार एकट्या कथित अध्यक्षाने पार पाडल्याने रहिवाशांमध्ये व मूळ सदस्यांमध्ये तीव्र रोष निर्माण झाला आहे.

भद्रावती शहरात आजच्या घडीला जमिनीचे मुल्य वधारले आहेत. हि वास्तविकता ध्यानात घेतल्यास आजच्या बाजारभावाने किमान दोन करोड रुपयांचा छुपा आर्थिक व्यवहार झाल्याचे सकृतदर्शनी दिसून येत आहे.पार पडलेल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून अत्यल्प भावात विक्री पत्र दर्शवून किमान अडीच कोटी रुपयांची फसवणूक सबंधित व्यक्तीने केल्याचे आरोप संताजी नगर वाशींकडून केले जात आहे.

पार पडलेल्या पत्रकार परिषदेला संताजी नगर गृहनिर्माण संस्थेचे मूळ सदस्य व रहिवाशी आनंदराव वाढई, बाबा तराळे, रितेश वाढई, भाजपाचे युवा नेते इम्रान खान, योगेश खोब्रागडे, हरी खोब्रागडे, मनोज आस्टूनकर, सुरेश मस्के, निखिल जुनघरे, महेश कोथले, कवीश्वर शेंडे आदी सह सर्व प्रभावित संताजी नगर चे रहिवासी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये