आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त घुग्घुस गांधी चौकात विनामूल्य आरोग्य शिबिराचे आयोजन
चांदा ब्लास्ट
घुग्घुस, चंद्रपूर | आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक १७ जानेवारी (शनिवार) रोजी गांधी चौक, घुग्घुस येथे चेतन बोबडे मित्रपरिवार यांच्या वतीने भव्य विनामूल्य आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले. या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून तब्बल ३४३ नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला.
शिबिराचे उद्घाटन नगराध्यक्ष दीप्ती सोनटक्के, शहर प्रमुख (शिवसेना) हेमराज बावणे तसेच उपस्थित मान्यवर डॉक्टरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून किरण देरकर तसेच उपनगराध्यक्ष राजू रेड्डी यांनी उपस्थिती दर्शवून आयोजकांचे कौतुक केले.
या आरोग्य शिबिरात विविध आजारांवर तपासणी, सल्ला व मार्गदर्शन देण्यात आले. शिबिर यशस्वी करण्यासाठी डॉ. सतीश खामनकर, डॉ. नितीन पाटील, डॉ. काजल खामनकर, डॉ. तेजस्विनी हरबडे, डॉ. पायल कोंडेकर, डॉ. स्नेहा बक्षी तसेच वर्षा ठाकरे व रोशन लोहकरे यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाच्या आयोजनात चेतन बोबडे, निशांत ठाकरे, कुलदीप इंगोले, अनुप कोंगरे, किरण पुरेली, रोशन दंतलवार, अबिश गोहोकर, धीरज धोके, किशोर चौधरी, मोनिका अतकारी, अस्मिता झाडे, दुर्गा खोंडे, निशा राम, राकेश पांघाटे, पवन ठाकरे, हर्ष चौधरी, मारुती जुमनाके आदींची उपस्थिती व सहकार्य लाभले.
सामाजिक बांधिलकी जपत राबविण्यात आलेल्या या आरोग्य शिबिरामुळे घुग्घुस शहरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत असून, आयोजकांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.



