मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा ३ अंतर्गत प्रियदर्शिनी कन्या विद्यालयाला पंचायत समिती चंद्रपूर पथकाची भेट

चांदा ब्लास्ट
घुग्घुस, चंद्रपुर | श्री साईबाबा ग्रामीण विकास संस्था, गडचिरोली द्वारा संचालित आयएसओ मानांकित प्रियदर्शिनी कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, घुग्घुस येथे आज शनिवार, दिनांक 17 जानेवारी 2026 रोजी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा – टप्पा ३ या उपक्रमांतर्गत पंचायत समिती, चंद्रपूर येथील पथकाने भेट दिली.
या भेटीप्रसंगी चंद्रपूर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी धनपाल फटिग, केंद्रप्रमुख अनिल दागमवार, केंद्रप्रमुख कोरडे, केंद्रप्रमुख ज्ञानदेवी वानखेडे तसेच केंद्रप्रमुख किशोर बेसेकर हे मान्यवर उपस्थित होते.
पथकाने शाळेचे सुशोभीकरण, शालेय परिसर, वर्गखोल्या, भौतिक सुविधा तसेच शालेय अभिलेखांची सखोल पाहणी केली. यासोबतच वर्गामध्ये प्रत्यक्ष जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत शाळेचे अंतर्गत व बाह्य मूल्यांकन करण्यात आले.
यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका अनु चोथे तसेच संपूर्ण शिक्षकवृंद उपस्थित होते. गटशिक्षणाधिकारी धनपाल फटिग यांनी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा – टप्पा ३ या उपक्रमाबाबत मार्गदर्शन करत शाळेच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.



