अल्ट्राटेक सिमेंटमुळे गडचांदूरमध्ये दुर्गंधीचा प्रश्न
सिंडिकेट ग्रुप जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
गडचांदूर शहरात अल्ट्राटेक सिमेंट कंपनीमुळे निर्माण होत असलेल्या तीव्र दुर्गंधीमुळे नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर सिंडिकेट ग्रुप तर्फे चंद्रपूर येथे माननीय जिल्हाधिकारी महोदयांना तक्रार निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात अल्ट्राटेक सिमेंट कंपनीमुळे परिसरात पसरत असलेल्या दुर्गंधीमुळे नागरिकांना श्वसनाचे त्रास, डोळ्यांची जळजळ तसेच दैनंदिन जीवनावर होणारा परिणाम याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. यावेळी माननीय जिल्हाधिकारी महोदयांशी सकारात्मक चर्चा झाली असून त्यांनी सदर तक्रारीची गंभीर दखल घेत तात्काळ आवश्यक कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
तथापि, प्रशासनाकडून ठोस कार्यवाही न झाल्यास येत्या पंधरा दिवसांत गडचांदूर येथील नागरिक व सामाजिक संघटनांच्या वतीने कठोर भूमिका घेतली जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
सदर निवेदन देताना सिंडिकेट ग्रुप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



