ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राज्य उत्पादन शुल्क विभागाची गोंडवाना पिंपरी येथे छापा टाकून धडक कारवाई

बनावट देशी - विदेशी दारुचा कारखाना होता सुरु ; 1 हजार 90 लिटर देशी दारुचा बनावट ब्लेंड जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

 राज्य उत्पादन शुल्क नागपूर विभागाचे विभागीय उपायुक्त गणेश पाटील व जिल्हा अधीक्षक सुरज कुमार रामोड यांच्या मार्गदर्शनाखालील विभागीय भरारी पथकाने गोंडवाना पिंपरी, हिंगणा येथील माय टाऊन सोसायटी, सेक्टर-8 येथील बंगलो क्रमांक 133 येथे नुकताच छापा टाकून बनावट देशी-विदेशी दारुच्या कारखान्याला टाळे ठोकले. घटनास्थळावरुन 1 हजार 90 लिटर देशी दारुचा बनावट ब्लेंड, महाराष्ट्रात विक्रीस प्रतिबंधीत असलेल्या गोवा व्हीस्कीच्या 356 बाटल्या, 90 बिएल बनावट देशी दारु, इलेक्ट्रानिक बॉटल सिलींग मशिन बनावट रॉकेट देशी दारु नावाचे कागदी लेबल, जीवंत पत्रीबुचे, रिकाम्या बाटल्या, बनावट रॉयल स्टग विदेशी दारुचे जीवंत प्लॉस्टीक जीवंत बुचे, चारचाकी वाहन असे एकूण 24 लाख 67 हजार 704 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यत आला.

या गुन्हा क्रमांक 19/2026 अन्वये शुभम गोविंद तिवारी वयवर्ष 31 ( फरार मुख्य आरोपी ), गोविंद रामदत्त तिवारी वयवर्ष 59, शैलेंद्र धुर्वे वय वर्ष 24, रघुनाथ उईके वयवर्ष 21, राजकुमार उईके वयवर्ष 25, द्वारका शिवलाल इनवाती वयवर्ष 45 व प्रमोद नथ्थुजी सयाम वयवर्ष 42 या आरोपींविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर कारवाई विभागीय भरारी पथकाचे निरीक्षक दशरथ क्षीरसागर, दुय्यम निरीक्षक जगदीश पवार, लांबाडे, निरीक्षक बालाजी चाळणेवार, दुय्यम निरीक्षक वैभव दीवाण, अमित क्षीरसागर, शुभम ढोके यांनी या कारवाईत सहकार्य केले. जवान सर्वश्री राहुल सपकाळ, गजानन राठोड, सुधीर मानकर, किरण वैद्य, सचिन आडोळे, विनोद डुंबरे यांनी ही कारवाई यशस्वीरित्या पार पाडली. सदरील गुन्ह्याचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक जगदीश पवार विभागीय भरारी पथक, नागपूर हे करीत आहेत. अवैध मद्य निर्मिती, विक्री, वाहतूक या संदर्भात कोणतीही तक्रार असल्यास टोल फ्रि क्रमांक 18002339999 व व्हॉटस्ॲप क्रमांक 8422001133 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाने केले आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये