नायलॉन मांजा विक्रीकरिता जवळ बाळगल्याप्रकरणी दोन आरोपीतांवर पोलीस स्टेशन, आर्वी येथे गुन्हा दाखल
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
दिनांक 12/01/2026 रोजी आरोपी नामे 1) पियुष विनायक टाकळे, वय 27 वर्ष, 2) विनायक गुलाबराव टाकळे, वय 58 वर्ष दोन्ही रा. रोहणा ता. आर्वी जि. वर्धा हे महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला नायलॉन मांजा वाहतुक करीत असतांना मिळून आल्याने त्यांचेकडून 55,600/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला त्यावरून आर्वी पोलीस स्टेशन येथे अपराध कमांक 37/25 कलम 223, 292 भारतीय न्याय संहिता 2023, सहकलम 5, 15 पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986, सहकलम 3(1), 181, 130, 177 मो.वा.का. प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.
मा. उच्च न्यायालय खंडपिठ नागपूर यांनी दि. 12/01/2026 रोजी नायलॉन मांजा बाबत दिलेल्या आदेशामध्ये नायलॉन मांजा चा वापर करून पतंग उडविताना मिळून आल्यास 25,000 रू. दंड अल्पवयीन असल्यास दंड पालकाकडून भरूण घेणे. नायलॉन मांजा विकी करताना मिळून आल्यास 2,50,000 रू. दंडाचे प्रावधान आहे, दंड भरण्यास टाळाटाळ केल्यास जमीन महसूल प्रक्रियेप्रमाणे दंड वसूल करण्यात येईल.



