ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

4 जानेवारी रोजी जायंटस वेलफेअर फाउंडेशन फेडरेशन कौन्सिलचा शपथविधी 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

जेन्ट्स वेल्फेअर फाउंडेशन 2 B च्या फेडरेशन कौन्सिल पदाधिकाऱ्यांचा शपथविधी सोहळा व युनिट कौन्सिल मिटिंग सह ट्रेनिंग प्रोग्राम दिनांक 4 जानेवारी रोजी देऊळगाव राजा शहरातील आर्या लॉन येथे आयोजित करण्यात आला आहे ,यासाठी विश्व उपाध्यक्ष विजयकुमार चौधरीसह जायंटस चे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत यावर्षी फेडरेशन अध्यक्ष म्हणून जुगलकिशोर हरकुट तर सेक्रेटरी पदावर सन्मती जैन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर सामाजिक क्षेत्रात काम करणारी अग्रगण्य संस्था म्हणून जायंट्स वेल्फेअर फाउंडेशन चे सर्व दूर नावलौकिक आहे जायंटस वेलफेअर फाउंडेशन या संस्थेचा उगम भारतात झाला असून परदेशात सुद्धा याचे जाळे विणल्या गेलेले आहे ,सद्यस्थितीत भारतात 16 फेडरेशन द्वारे कामकाज सुरू आहे संपूर्ण भारतात व भारताबाहेर 20 हजार चे वर सदस्य संख्या असून फेडरेशन दोन B साठी 2026 करिता फेडरेशन अध्यक्ष या पदावर जुगल किशोर हरकुट तर सेक्रेटरी पदावर सन्मती जैन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

या सोबतच फेडरेशन कौन्सिल पदाधिकाऱ्यांचा शपथविधी सोहळा ट्रेनिंग प्रोग्राम व प्रथम कौन्सिल मिटींगचे आयोजन दिनांक 4 जानेवारी 26 रोजी करण्यात आलेले आहे यासाठी विश्व उपाध्यक्ष विजयकुमार चौधरी, स्पेशल कमिटी सदस्य विनोद शेवतेकर, सुवर्णमाला मालानी, संजय गुगळे, जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश कव्हळे, फेडरेशन अध्यक्ष गुरुदत्त राजपूत, सेक्रेटरी रंजना भावसार, माजी फेडरेशन अध्यक्ष पुरुषोत्तम धण्णावत,उपस्थित राहणार असल्याची माहिती ग्रुपचे अध्यक्ष प्राध्यापक कल्यान चांडगे यांनी दिली आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये