ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चौथ्या दिवशी 66 उमेदवारी अर्ज दाखल – 300 उमेवारी अर्जांची उचल

मंगळवारी ११ ते २ वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूकीचे बिगुल वाजले असुन आगामी निवडणुकीकरिता सोमवार दिनांक 29 डिसेंबर 2025 रोजी 66 नामनिर्देशन दाखल करण्यात आली आहे. तसेच 300 नामनिर्देशन पत्रांची उचल करण्यात आली असुन शनिवार दिनांक 30 डिसेंबर रोजी दुपारी 2:00 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार आहे.

   मनपा सार्वत्रिक निवडणूकीसाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची 5 कार्यालये स्थापण्यात आली असुन नामनिर्देशन दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी एकुण 173 इच्छूकांनी 300 नामनिर्देशन पत्रांची उचल केली. 30 डिसेंबर ही उमेवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असल्याने दुपारी 2:00 वाजेपर्यंत इच्छुकांना नामनिर्देशन पत्रे प्रत्यक्षरित्याच (ऑफलाईन) सादर करता येत आहेत.

महापालिका निवडणुकीसाठी स्थापन केलेल्या निवडणूक निर्णय अधिकारी क्रमांक १  (प्रभाग क्र. 1, 2 व 5) मधे 24 इच्छुकांद्वारे 37 अर्जांची उचल केली असुन 11 अर्ज दाखल करण्यात आले आहे.

निवडणूक निर्णय अधिकारी क्रमांक 2 (प्रभाग क्र. 3, 4 व 6) – 37 इच्छुकांनी 59 अर्जांची उचल केली तर 18 अर्ज दाखल झाले.

निवडणूक निर्णय अधिकारी क्रमांक 3 (प्रभाग क्र. 7, 8 व 9) मधील कार्यालयात आज 14 अर्ज दाखल करण्यात आले तर 50 इच्छुकांद्वारे 97 अर्जांची उचल केल्या गेली.

निवडणूक निर्णय अधिकारी क्रमांक 4 (प्रभाग क्र. 10, 11, 12 व 15) – 40 इच्छुकांनी 72 अर्जांची उचल केली व 18 अर्ज दाखल करण्यात आले.

निवडणूक निर्णय अधिकारी क्रमांक 5 (प्रभाग क्र. 13, 14, 16 व 17) – 22 इच्छुकांनी 35 अर्जांची उचल केली तर आज 5 अर्ज दाखल करण्यात आले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये