ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पालडोह शाळेचे बालवैद्यानिक चमकले

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे

जिवती :- जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पालडोह ही चंद्रपूर जिल्ह्यातील नाविन्यपूर्ण ३६५ दिवस चालणारी शाळा आहे. या शाळेने राज्यभर आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. नुकत्याच पार पडलेल्या ५३ व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी मध्ये बाल वैज्ञानिक यांनी आपली छाप सोडत दोन पारितोषिक मिळवली.

  या वर्षी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी ही जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पालडोह येथे संपन्न झाली.प्रथमच तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी ही जिल्हा परिषद शाळेत संपन्न झाली.साधारण उच्च प्राथमिक गटातून इयत्ता ६ वी ते इयत्ता ८ वी च्या गटातून द्वितीय क्रमांक पटकावला. उपक्रमाचा विषय शाश्वत भविष्यासाठी नैसर्गिक शेती हा विषयावर प्रकल्प तयार करण्यात आला. याचे सादरीकरण आदित्य बाजगीर व मनोहर दुधभाते यांनी केले.तर मार्गदर्शक शिक्षिका म्हणून पूजा चव्हाण यांनी हा प्रकल्प तयार केला.

   माध्यमिक गटातील इयत्ता ९ वी ते इयत्ता १२ वी या गटातून प्रकल्प सादरीकरण सोहम वाघमारे व शिवम सोडणर या विद्यार्थ्यांनी करत प्रथम स्थान पटकावले.याला मार्गदर्शक शिक्षक म्हणून खवशी यांनी केले. या गटात “स्मार्ट सायकल” तयार करून पालडोह या शाळेतील बाल वैज्ञानिक असल्याचा पुरावा या शाळेने दाखवून दिला.ही स्मार्ट सायकल स्वतः सोहम वाघमारे या मुलानी तयार केली.रात्रीच्या वेळी सायकल ने प्रवास करता यावा म्हणून त्याने सायकल ला समोर लाईट बसवले व पाठीमागे इंडिकेटर बसवून स्मार्ट सायकल तयार करत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळवले.

जी बॅटरीवर चालत असून ती बॅटरी ऑटोमॅटिक चार्ज होत असून रात्री सायकल चालवण्यास उपयुक्त ठरेल अशी प्रतिकृती तयार केली.यासाठी शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र परतेकी यांनी प्रोत्साहन दिले. शाळेला विज्ञान शिक्षक नसतानाही या तालुकास्तरीय विज्ञान स्पर्धेत पालडोह या शाळेने तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी मध्ये सर्वसाधारण उच्च प्राथमिक गट व सर्वसाधारण माध्यमिक गटात पालडोह शाळेने वर्चस्व स्थापन केले.

या विजयामुळे शाळेतील शिक्षक राठोड,आडे,खवशी,गाकरे, कु इंझळकर,धुळगुंडे, कु बोवाडे, कु पवार,शाळेचे मुख्याध्यापक परतेकी तसेच शालेय व्यवस्थापन समिती यांनी मुलांचे अभिनंदन केले.

या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाला महेश देवकते,सुग्रीव गोतावळे, सरपंच वर्षाराणी जाधव,ठाणेदार जगन्नाथ मडावी,गट विकास अधिकारी लक्ष्मीनारायण दोडके, गट शिक्षण अधिकारी अमर साठे, विस्तार अधिकारी संदीप चौधरी, केंद्र प्रमुख सुनील जाधव, सुरेश केंद्रे,गोदावरी केंद्रे,अंकुश राठोड, ऋषिकेश निमकर यांनी भेटी दिल्या.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये