ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
जुना बाजार चौक, पोंभुर्णा येथे कबड्डी स्पर्धेचे जल्लोषात उद्घाटन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. विजय वासेकर
पोंभुर्णा : शहरातील जुना बाजार चौक येथे श्री गणेश क्रीडा मंडळ, पोंभुर्णा यांच्या वतीने आयोजित ४२ किलो वजन गटातील कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. या स्पर्धेचे उद्घाटन नरसेवक गणेशभाऊ वासलवार व महेशभाऊ श्रीगिरीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
उद्घाटनिय सामन्यात श्री साई क्रीडा मंडळ, पोंभुर्णा संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत विजय मिळविला. विजेत्या संघाला गणेशभाऊ वासलवार यांच्या हस्ते ₹५०१/- रोख पारितोषिक प्रदान करण्यात आले.
या स्पर्धेला खेळाडू तसेच क्रीडाप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून परिसरात क्रीडामय वातावरण निर्माण झाले आहे



