ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
निधन वार्ता : महादेवराव लटारी डाहुले

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
भद्रावती : जिल्हा परिषद सेवानिवृत्त शिक्षक संघटनेचे जिल्हा सचिव तसेच सेवानिवृत्त उच्चश्रेणी मुख्याध्यापक महादेवराव लटारी डाहुले यांचे शनिवार, दिनांक २७ डिसेंबर रोजी पहाटे १२ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय ८२ वर्षे होते.
त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, सुना, नातवंडे तसेच मोठा आप्तपरिवार आहे. त्यांच्यावर स्थानिक स्मशानभूमीत दुपारी १२ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.



