प्रभाग क्रमांक ३, ४ व ६ साठी निवडणूक व नामनिर्देशन विषयक माहिती बैठकीचे आयोजन

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर :_ मा. राज्य निवडणूक आयोगाने चंद्रपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ चा कार्यक्रम जाहीर केला असून, त्या अनुषंगाने प्रभाग क्रमांक ३, ४ व ६ मधील सार्वत्रिक निवडणूक व नामनिर्देशन प्रक्रियेबाबत माहिती देण्यासाठी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली असल्याची माहिती प्रभाग क्रमांक ३, ४ व ६ च्या निवडणूक निर्णय अधिकारी लधिमा तिवारी यांनी दिली.
चंद्रपूर महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभाग क्रमांक ३, ४ व ६ मधील राजकीय प्रतिनिधी व इच्छुक उमेदवार यांना निवडणूक प्रक्रिया, नामनिर्देशन अर्ज भरण्याची पद्धत, आवश्यक कागदपत्रे, निवडणूक वेळापत्रक तसेच इतर महत्त्वाची माहिती देण्याच्या उद्देशाने ही बैठक आयोजित करण्यात आली आहे.
सदर बैठक दिनांक २६ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ४.०० वाजता, मनपा सभागृह, एम. बी. शाळेजवळ, कृष्णनगर येथे आयोजित करण्यात आली असुन बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन प्रभाग क्रमांक ३, ४ व ६ मधील सर्व राजकीय प्रतिनिधी व इच्छुक उमेदवार यांना करण्यात येत आहे.



