ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

क्रीडासत्रातुन निर्माण होते सांघिकतेची भावना – सहायक आयुक्त शुभांगी सूर्यवंशी  

मनपा शालेय क्रीडासत्राला सुरवात  ; ६०० विद्यार्थ्यांचा सहभाग

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर :_ मानसिक व शारीरिक स्वाथ्यासाठी मैदानी खेळ आवश्यक आहेत. जिंकलो तर यश कसे पचवावे व हरलो तर नवीन उमेदीने कसे उभे राहावे हे खेळ आपल्याला शिकविते.सहनशीलता,शिस्त, धैर्य, आत्मविश्वास, खेळात वाद झाला तर संयमाने कसा सोडवावा हे सगळे गुण या क्रीडासत्रातुन निर्माण होऊन सांघिकतेची भावना विद्यार्थ्यांमध्ये वाढीस लागेल अशी आशा मनपा सहायक आयुक्त सहायक आयुक्त शुभांगी सूर्यवंशी यांनी व्यक्त केली.

  कोहिनुर मैदानात चंद्रपूर महानगरपालिका शाळांच्या २०२५-२६ क्रीडासत्राला २४ डिसेंबर रोजी सहायक आयुक्त शुभांगी सूर्यवंशी यांच्या हस्ते उदघाटन करून सुरवात करण्यात आली. याप्रसंगी सहायक आयुक्त संतोष गर्गेलवार,प्रशासन अधिकारी सुनील आत्राम व्यासपीठावर उपस्थीत होते.

   क्रीडासत्रात मनपाच्या २६ शाळांचे ६०० विद्यार्थी सहभागी होणार आहेत. ३ दिवसीय क्रीडासत्रात खो-खो,कबड्डी,गोळा फेक, रीले रेस, लांब उडी, वैयक्तीक कौशल्य इत्यादी विविध मैदानी खेळ खेळले जाणार आहेत. ३ दिवस विद्यार्थ्यांच्या भोजनाची तसेच मध्यान्हात दुध देण्याची व्यवस्था मनपातर्फे येणार आहे.

    विद्यार्थ्यांचे सामूहिक संचलन, स्वागत नृत्य, शो ड्रिल हे कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले. स्वागत नृत्य भारतरत्न भीमराव आंबेडकर शाळेच्या विद्यार्थ्यांनी सादर केले. तसेच लोकमान्य टिळक कन्या शाळा, रयतवारी कॉलरी मराठी शाळा, पी.एम. श्री. शहीद भगतसिंग शाळा, पी.एम. श्री .सावित्रीबाई फुले या शाळांनी आकर्षक शो ड्रील सादर केल्या. अध्यक्ष शुभांगी सूर्यवंशी यांनी खेळाडूंना शपथ दिली. तसेच प्रमुख अतिथी संतोष गर्गेलवार यांनी पंचांना शपथ दिली.

    कार्यक्रमाचे संचालन सौ स्वाती बेत्तावार केंद्र समन्वयक आणि भूषण बुरटे सहाय्यक शिक्षक यांनी केले. तसेच आभार प्रदर्शन श्री सुनील आत्राम प्रशासन अधिकारी शिक्षण विभाग चंद्रपूर शहर महानगरपालिका चंद्रपूर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महानगरपालिकेच्या सर्व शाळांचे मुख्याध्यापक शिक्षकवृंद तथा सर्व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये