गावातील सुशिक्षीत बेरोजगारांना कामे द्यावीत
प्रकलपग्रस्त युवा सघर्ष समितीचे केपीसीएलला निवेदन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
भद्रावती तालुक्यातील बराज येथेल केपीसीएल कपणिची कोळसा खाण आहे. मात्र कपणीच्या माध्यमातून निघणारी विविध कामे गावातील होतकरु व सुशिक्षीत तरुणांना मिळत नाही. त्यामुळे त्यांना रोजगार ऊपलब्ध होत नाही. हि समस्या लक्षात घेऊन कपणीतून निघणारी छोटीमोठी गावे गावातील सुशिक्षित तरुणांना व बचत गटाना देण्यात यावी अशी मागणी चेकबराज येथील प्रकल्पग्रस्त युवा सघर्ष समितीच्या वतीने केपीसीएल कपणीला सादर करण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.
आठ दिवसात यावर विचार न केल्यास सघर्ष समितीतर्फे याविरोधात आदोलन ऊभारण्याचा इशारा सदर निवेदनातून देण्यात आला आहे. गावात सोसायट्या व बचतगट कार्यरत आहेत त्यांच्या माध्यमातून कपणीतील निघणारी कामे ही गावातीलच सुशिक्षित तरुणांना देण्याची मागणी सदर निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन सादर करताना सघर्ष समितीचे पदाधिकारी व सदस्य ऊपस्थीत होते.



