ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
ग्राहक पंचायतीतर्फे नवनिर्वाचित नगराध्यक्ष चटकी यांचा सत्कार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
अखिल भारतीय ग्राहक समिती भद्रावती ची साप्ताहिक बैठक शहरातील गुरुनगर येथे सपन्न झाली. या बैठकीत भद्रावती नगरपरीषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रफुल्ल चटकी यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला व त्यांच्याकडून शहराच्या विकासाची अपेक्षा व्यक्त करण्यात आली. सत्काराला ऊत्तर देताना चटकी यांनी भद्रावती शहराचा सर्वांगीण विकास करण्याचे आश्वासन दिले.
या बैठकीत विवीध विषयावर चर्चा करण्यात आली बैठकीला अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे वामन नामपल्लीवार, वसंत वराटे, गोपाल घुमे, मोहन पवार, गुलाब लोणारे, शेखर घुमे, बालाजी दांडेकर, अतुल कोल्हे, बाळा कुटेमाटे तसेच सौ. करुणा मोघे, सौ. मायाताई नारळे, शीला आगलावे, शीला चामाटे, सौ. लीला ढवळे, सौ गीता जयपूरकर आदी मान्यवर उपस्थित.



