ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

फेडरेशन दोन ब चे अध्यक्ष होण्याचा बहुमान मिळाला देऊळगाव राजा ग्रुपला

जायंटस वेलफेअर फाउंडेशन या सामाजिक संस्थेचे पन्नासावे आंतरराष्ट्रीय अधिवेशनात मथुरा येथे झाला शपथविधी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

  भारतात 1975 मध्ये जायंट्स वेल्फेअर या सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेची स्थापना झाल्यानंतर भारताबाहेर सुद्धा याची व्याप्ती झाल्याने या संस्थेला आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करण्याची संधी प्राप्त झाली. संस्थापक स्वर्गीय नाना चुडासामा यांची दूरदृष्टीने भारतभर व भारताच्या बाहेर जायंटस सदस्यांनी भरीव काम केले दिनांक 19,20 व 21 डिसेंबर 25 रोजी *उत्तर प्रदेश मधील मथुरा* या शहरात या संस्थेचे गोल्डन जुबली आंतरराष्ट्रीय अधिवेशन पार पडले याच अधिवेशनात विविध फेडरेशन अध्यक्षांना नियुक्त करून त्यांना शपथ देण्यात आली यामध्ये फेडरेशन दोन बचे फेडरेशन अध्यक्ष म्हणून देऊळगाव राजा जायंटस ग्रुपचे माजी अध्यक्ष जुगल किशोर हरकुट,सेक्रेटरी म्हणून ग्रुपचे माजी अध्यक्ष सन्मती जैन (पत्रकार)यांना संधी देण्यात आलेली आहे भारतात एकूण 16 फेडरेशन कार्यरत आहेत फेडरेशन दोन ब मध्ये 25 ग्रुप कार्यरत आहेत देऊळगाव राजा शहराला 50 वर्षात हा बहुमान दुसऱ्या वेळेस मिळालेला आहे हे विशेष.

 याबाबत

 सविस्तर असे की जायंटस वेल्फेअर फाउंडेशनचे आंतरराष्ट्रीय गोल्डन जुबली अधिवेशन उत्तर प्रदेश मधील मथुरा या शहरात दिनांक 19 ते 21 डिसेंबर 25 या कालावधीत संपन्न झाले भारतात व भारताबाहेर ज्या ज्या ग्रुपने सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य विषयक, धार्मिक, अवयव दान,क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले त्या ग्रुपचा व त्या ग्रुप मधील सर्व पदाधिकाऱ्यांचा पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला यामध्ये देऊळगाव राजा जायंटस ग्रुपचे डॉक्टर अशोक काबरा, जुगल किशोर हरकुट, सन्मती जैन, ग्रुपचे अध्यक्ष कल्याण चांडगे, ॲड,पुरुषोत्तम धण्णावत यांनी मरणोत्तर नेत्रदान चळवळीमध्ये भरिव योगदान दिल्याबद्दल व आतापर्यंत 210 नागरिकांचे मरणोत्तर नेत्रदान करून घेतल्याबद्दल ग्रुप सह या सर्वांना यथोचित सन्मानित करण्यात आले तर फेडरेशन अध्यक्षपदी या ग्रुपचे माजी अध्यक्ष जुगल किशोर हरकुट यांची तर फेडरेशन सेक्रेटरी पदी सन्मती जैन यांची 2026 करीता निवड झाल्यानंतर मथुरा येथे फेडरेशन अध्यक्षांचा शपथविधी कार्यक्रम संपन्न झाला यावेळी जायंटस वेलफेअर फाउंडेशनचे विश्व अध्यक्ष शायना एन.सी. केंद्रीय मंत्री लक्ष्मी नारायण चौधरी, आमदार श्रीकांत शर्मा, मोटिवेशनल स्पीकर जय मदन, विश्व उपाध्यक्ष सी.ए. लक्ष्मणन एम, एस.पी. चतुर्वेदी, दिनकर अमीन, नवरोद्दीन शेववाला, व्यवस्थापक वीरेंद्र अय्यर, फेडरेशन अध्यक्ष गुरुदत्त राजपूत, सूर्यमाला मालानी, विनोद शेवतेकर, संजय गुगळे, अमित मालानी, दिनेश सावजी,सुमित गुप्ता, श्रीनिवास कोंडले,उपस्थित होते

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये