नवनिर्वाचित नगर परिषद अध्यक्ष माधुरी शिपणे यांचा नाथ जोगी समाजच्या वतीने सत्कार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
नगर परिषद देऊळगाव राजाच्या नवनिर्वाचित अध्यक्ष माधुरीताई तुषार शिपणे यांचा नाथ जोगी समाजाच्या वतीने शाल, श्रीफळ,हार घालून सत्कार करण्यात आला.गोविंदराव बोरकर यांच्या निवास स्थानी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात त्यांचे पती तुषार शिपणे, सासरे श्री धनसिरामजी शिपणे उपस्थित होते. गोविंद भिकानाथ बोरकर यांनी नाथ जोगी समाजाला स.नं७३वर १४आर दफनभूमी जागेवरील विकासासाठी नवनिर्वाचित अध्यक्षांचे लक्ष वेधले. समाजातील मान्यवरांनी आपल्या समाजाच्या समस्या सांगितल्या.
श्री.धनश्रीरामजी सिपणे यांनी नाथ जोगी समाजाच्या दफनभूमी विकासासाठी आपण कटीबध्द असल्याची हमी दिली.यावेळी श्रीमती सत्यभामाबाई टेकाळे माजी नगराध्यक्षा,श्री.संतोष सोनुने, संतोष राजपूत, रामप्रसाद गवळी,सावन पवार, संतोष बोरकर, नितिन बोरकर, अमोल बोरकर, प्रकाश गोवर्धने,आकाश बोरकर, सचिन बोरकर, सौ.पुष्पाबाई गोविंद बोरकर,सौ.अनुराधा सचिन बोरकर, उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रकाश अहिरे यांनी केले.



