रूपापेठ येथे पेसा दिन उत्सहात साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर
कोरपना तालुक्यातील रूपापेट येथे पेसा दिन( पंचायत विस्तार कायदा 1996) दिनांक 24 डिसेंबर 2025 ला उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाची विधिवत सुरुवात आदिवासींचे आद्य क्रांतिकारक धरती आबा भगवान बिरसा मुंडा व वीर बाबुराव शेडमाके यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
पेसा कायद्याविषयी विविध योजनांची माहिती या कार्यक्रमांमध्ये ग्रामस्थांना देण्यात आली धरती आबा उन्नत उत्कर्ष ग्राम अभियान या योजनेअंतर्गत केंद्र सूचीतील गावांना पेसा दिनानिमित्त विविध विभागाच्या योजना या ग्रामस्तरावर 17 विभागाच्या वतीने 25 योजना येतील आणि त्या योजनांचा ग्रामस्थांनी लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष सरपंच अवंतिकाताई आत्राम होत्या तर मार्गदर्शक म्हणून आदिवासी सामाजिक कार्यकर्ते प्रमोदभाऊ कोडापे हे होते.
यावेळी विशेष अतिथी म्हणून माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य विलास पाटील आळे ग्रामपंचायत सदस्य म्हणून मनोजभाऊ तुमराम ग्रामपंचायत सदस्य रवींद्र जुनगरे, ग्रामपंचायत सचिव अश्विनी कुडमेथे, माजी सरपंच शामराव मंगाम, सुधाकर नैताम, अंगणवाडी सेविका सुनिता जुनघरे, रोजगार सेवक रामू एडमे, सीआरपीएफ सुवर्ण आत्राम,पेसा मोबाईलवर किरण आळे, बचत गटाच्या महिला व पुरुष आदी उपस्थित होते.



