ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अश्लील वर्तन व धमकावणे पडले महाग

मा. प्रथम श्रेणी न्यायालयाने ठोठावली शिक्षा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

           भद्रावती पोलिस स्टेशन अंतर्गत २०१८ मध्ये अपराध क्रमांक.६८/२०१८अन्वये कलम २९४ व ५०६ अश्लील वर्तन व शिवीगाळ तसेच जीवितास धोका होईल अश्या स्वरूपाची धमकी देने याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादी घनश्याम शेषराव उताणे यांचे तक्रारीवरून आरोपी नितीन उर्फ वीरप्पन प्रकाश ढेंगळे वय.३२ रा. मांगली तह.भद्रावती यांचे विरुद्ध तपास अधिकारी नापोका प्रभाकर आडे/२१२६ यांनी तपास पूर्ण करून सदर प्रकरण दिवाणी व फौजदारी न्यायालय भद्रावती कोर्टात वर्ग करण्यात आले होते.

मा. प्रथम श्रेणी न्यायालय भद्रावती यांनी सदर प्रकरणाचा निकाल दिनांक.२३डिसेंबर २०२५ रोजी जाहीर करून आरोपीस भारतीय दंड संहिता १८६०च्या कलम २९४ अन्वये शिक्षेस पात्र असलेल्या गुन्ह्यास दोषी ठरवून आरोपीला तीन महिने साधी कैद व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. दंड न भरल्यास आणखी एक महिना साधी कैद भोगावी लागेल.

तद्वतच भारतीय दंड संहिता १८६०अन्वये कलम ५०६ दोषी ठरवून शिक्षेस पात्र ठरवून तीन महिने साधी कैद व व पाच हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. दंड न भरल्यास आणखी एक महिना साधी कैद भोगावी लागेल. दोन्ही गुन्ह्यातील शिक्षा सदर आरोपीस एकाच वेळी भोगावी लागेल. असे मा. न्यायालयाने निकालपत्रात नमूद केले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये