ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिल्हा पोलीसांतर्फे मनोविकल व्यक्तींबाबत विशेष शोध मोहीम

२५ मनोविकल व्यक्तींना उपचारकामी भरती  

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

मनोविकल व्यक्ती समाजात वावरत असताना त्यांची मानसिक स्थिती अचानकपणे बिघडल्यास ते सर्वसामान्य व्यक्तींना इजा पोहचवू शकतात व त्यावरुन त्यांच्यावर जबरी हमला करुन त्यांचा मृत्यू घडवून आणू शकतात नुकताच आवीं शहरात अशा प्रकारची घटना घडली असून सदर बाबींमुळे सर्वसामान्य जनतेमध्ये मनोविकल व्यक्तीविषयी भितीचे वातावरण तयार होवून सदर मनोविकल व्यक्तीने सर्व सामान्य व्यक्तींवर केलेल्या हलल्यामुळे इतर लोकांकडून अशा मनोविकल व्यक्तीवर एकत्रित हल्ला होवून गंभीर घटना घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवु शकतो.

मनोविकल व्यक्तीवर वेळीच लक्ष देउन त्यांचेवर मानसिक आरोग्य काळजी अधिनियम १९८७ अन्वये योग्य उपचार होणे आवश्यक असल्याने, पोलीस अधीक्षक श्री सौरभकुमार अग्रवाल व अपर पोलीस अधीक्षक श्री सदाशिव वाघमारे यांनी वर्धा जिल्ह्यामध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून संपूर्ण वर्धा जिल्ह्यात १९ पोलीस स्टेशन अंतर्गत दि.२७/०१/२०२६ ते ०२/०२/२०२६ पावेतो मनोविकल व्यक्तीचे बाबत विशेष शोधमोहीम राबविण्यात आली.

सदर विशेष शोधमोहीमेदरम्यान मनोविकल व्यक्तींचा पोलीस विभागातर्फे शोध घेण्यात आला त्याकरिता अशासकिय संस्था (NGOs), सामाजिक संस्था व इतर विभागाची मदत घेवून जिल्ह्यात एकूण २५ मनोविकल व्यक्ती शोधण्यात आले, तसेच त्यांचे पालक व नातेवाईकांचा शोध घेवून त्यांना विश्वासात घेवून मनोविकल व्यक्तींना उपचारकामी विविध मनोरुग्णालय येथे दाखल करण्यात आले आहे. श्री सौरभकुमार अग्रवाल पोलीस अधीक्षक वर्धा यांनी यापुढेही जिल्ह्यात अशा प्रकारची मोहीम राबविण्यात येवून मनोविकल व्यक्तींना योग्य उपचार मिळणेकरिता व त्यांना योग्य निवारा मिळणेकरिता असा उपक्रम राबविण्यात येईल अशी माहीती दिली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये