सावंगी मेघे पोलिसांची कारवाई सराईत गुन्हे करणारा आरोपी तडीपार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
माननीय पोलीस अधीक्षक साहेब, वर्धा यांनी सराईत गुन्हेगार यांचे तडीपार प्रस्ताव तयार करून एस. डी. एम. कार्यालय, वर्धा येथे मंजुरी करिता पाठवणे बाबत आदेशीत केले होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन सावंगी हद्दीतील सराईत गुन्हेगार आरोपी नामे दिलेर सिंग उर्फ हड्डी नेपालसिंग बावरी, वय 25 वर्ष, रा. शिखवेडा, वर्धा याचा हद्दपार प्रस्ताव माननीय एस. डी. एम कार्यालय वर्धा येथे सदर करण्यात आला होता.
माननीय एस. डी. एम. साहेब वर्धा यांनी सदर आरोपीला मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 56 (1), (अ) अन्वये वर्धा जिल्ह्यातून सहा महिन्याचे कालावधी करिता हद्दपार केले आहे. सदर आरोपीला कळमेश्वर येथे हद्दपार कालावधी करिता सोडण्यात आले असून सदरचा आदेश त्याला तामिल करण्यात आला आहे. त्यामुळे इतर आरोपीच्या मनामध्ये काययद्याच्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सदरची कारवाई श्री सौरभ कुमार अग्रवाल IPS, पोलीस अधीक्षक, वर्धा, श्री सदाशिव वाघमारे, अपर पोलीस अधीक्षक, वर्धा, श्री प्रमोद मकेश्वर, उपविभागीय पोलीस अधिकारी, वर्धा यांच्या मार्गदर्शनाखाली पंकज वाघोडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, ठाणेदार सावंगी मेघे पोलीस स्टेशन, PSI नची शेख, पोलीस हवालदार संजय पंचभाई, अनिल वैद्य, सचिन घेवंदे, सरोज पाली, पोशि हर्षवर्धन मुन, निखिल फुटाने, अमोल जाधव, दुर्गा ठग यांनी केली.



