ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बेलगाव येथे भव्य मोफत आरोग्य शिबिर,आयुष्मान कार्ड नोंदणी तथा NCD आरोग्य तपासणी संपन्न 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

 प्राथमिक आरोग्य केंद्र नारंडा अंतर्गत उपकेंद्र पिपरडा मधील अति दुर्गम आदिवासी भागातील बेलगाव येथे आज एनसीडी आरोग्य तपासणी तथा आयुष्यमान कार्ड नोंदणी शिबिर राबविण्यात आले.

याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर कुलभूषण मोरे (माणसेवी वैद्यकीय अधिकारी) यांनी आरोग्य जनजागृती पर मार्गदर्शन केले. मधुमेह बीपी कॅन्सर आरोग्य स्वच्छता पोषण आहार या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच प्रमुख उपस्थित राठोड सर (मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळा) आरोग्य सेविका फुलमाळी सिस्टर मंडल सिस्टर पिल्लेवान आरोग्य सहाय्यक राठोड जी आरोग्य सेवक आशा वर्कर कर्मचारी उपस्थित होते. ग्रामपंचायत बेलगाव चे कर्मचारी उपस्थित होते.

 यामध्ये एनसीडी रुग्ण 110 आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आयुष्मान आरोग्य कार्ड ची नोंदणी करण्यात आली तसेच गरोदर व स्तनदा माता यांचे आरोग्य तपासणी करून संदर्भ सेवा देण्यात आली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये