ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कुसुंबीच्या आदिवासीच्या गावाला मानीकगड सिमेंट कंपनी कडून तटबंदी सर्व गेट बंद करूण वाहतुक थांबविली  

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

       गडचांदूर स्थित अल्ट्राटेक सिमेंट कंपनीचे माणिकगड युनिट मोजा कुसुंबी येथील जमिनीचा वाद न्यायालयाच्या खंडपीठात न्यायप्रविष्ठ असताना व त्या प्रकरणाचा कोणताही निवडा झाला नसताना माणिकगड सिमेंट कंपनीमध्ये 6 8.2018 मध्ये गावठाण सर्वे नंबरच्या एक हेक्टर क्षेत्रामध्ये 84 कुटुंबाने वास्तव्य करीत असल्याचे व त्या ठिकाणी कुटुंब राहत असताना माणिकगड सिमेंट कंपनीने आदिवासींची दमदाटी करून व काही अधिवाशांना प्रति हेक्टर दहा लाख रुपये देण्याचे आम्हीच दाखवून यापूर्वी 63.62 जमिनीचे जमिनीचा मोबदला दिल्याचे शपथपत्र जिल्हाधिकारी तहसीलदार यांच्यासह कंपनी व्यवस्थापनाने न्यायालयात सादर केले होते त्या अनुषंगाने पिटीशन क्रमांक 913 खारीजकंपनीच्या बाजूने निर्णय दिला होता 1984 85 मध्ये ज्या शेतकऱ्यांना मोबदला देण्यात आला तो भूपृष्ठ अधिकाराचा म्हणून आणित्या जमिनीचा ताबा देखील त्या कालावधीमध्ये घेण्यात आला.

सदर प्रकरण नागपूर खंडपीठामध्ये प्रलंबित असून अजून पर्यंत कोणताही निर्णय झाला नसताना माणिकगड सिमेंट कंपनीच्या व्यवस्थापनाने 24 आदिवासी कुटुंबांना वेळोवेळी सभा बैठका घेऊन जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी यांच्याकडून कोणताही कायदेशीर जमिनीचा मोबदला पुनर भूपृष्ठ अधिकार निधी देण्याबाबत आदेश झाले नसताना कंपनीने शंभर रुपयांच्या स्टॅम्पवर हक्क सोडणे नव्याने तयार करून त्या कुटुंबांना पैशाची आम्हीच दाखवली व त्यांच्याकडून आपल्या सोयीनुसार दस्तावेज तयार करण्यात आले ही बाब गंभीर असून महाराष्ट्र शासनाच्या महसूल अधिनियम अथवा आदिवासी संरक्षण कायदा अंतर्गत अशा प्रकारचे कागदपत्र तयार करून दिशाभूल केल्या जात आहे.

ज्या आदिवासी कुटुंबांचे तत्कालीन उपविभागीय अधिकारी तहसीलदार व पोलीस अधिकारी यांनी मौक्यावर भेटी देऊनमंडल अधिकारी तलाठी यांनी जमीन संबंधात संपूर्ण अहवाल जिल्हाधिकारी शासन यांना दिला होता त्याचबरोबर विधानसभेमध्ये चार आमदारांनी तारांकित प्रश्न व लक्षवेधी केली असता त्यांचे उत्तर स्वतः मुख्यमंत्री यांनी भूपृष्ठ अधिकाराचा मोबदला देण्यात आला असून जमिनीचा भूपृष्ठ अधिकार कंपनीला बाल केला आहे तसेच कंपनीने सुद्धा शपथपत्र दाखल करून पैसे दिले होते तर मग नव्याने का म्हणून पैसे दिले आहे हा प्रश्न उपस्थित होत असून कंपनीच्या मनमानीमुळे या पंचकोशीतील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण असून नोकरी आसापुर जाणारा रस्ता तहसीलदार यांनी सात सात 2020 ला खुला करून दिला होता.

मात्र गेल्या तीन दिवसापासून संपूर्ण प्रवेशद्वार बंद केले असून लोकांना जाण्या येण्यासाठी मज्जाव केल्या जात आहे सदर रस्ता हा निस्तार हक्काचा व सार्वजनिक असून याबाबतचा कोणताही भूपृष्ठ अधिकार कंपनीला दिलेला नाही असे असताना ज्योती तालुक्याशी जोडणारा आठ ते दहा गावाचा रस्ता बंद पाडला आहे तसेच प्रधानमंत्री सडक योजनेत हा रस्ता कंपनीचा नसताना सुद्धा एक किलोमीटर बांधकाम कंपनीने यापूर्वी रोखले असून रस्त्याचे काम मध्यंतरी बंद पडले आहे.

हा सर्व प्रकार वेठीस धरणारा व अन्याय करणारा असून कंपनीने बेकायदेशीर सार्वजनिक रस्त्यावर बसवलेले गेट व त्याला लावण्यात आलेले ताले तात्काळ खुले करण्यात यावे अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केले आहे

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये