ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अपनापन वृद्धाश्रमाच्या माध्यमातून घडतेय वृद्धांची सेवा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

        असे म्हणतात की माणसाला आपल्या जीवनात अनेक ऋण फेडावे लागतात, त्यातलंच एक म्हणजे ‘समाज ऋण’ होय. आपण ज्या समाजात लहानाचे मोठे होतो, वावरतो, अनेक चांगले-वाईट अनुभव घेतो, शिकतो, त्या समाजाप्रति आपलं सुद्धा काही देणं लागतं, या एका मानवतावादी विचाराला घेऊन शहरातील काही तरुण मंडळी पुढे येऊन वृद्धाश्रमाच्या माध्यमातून वृद्धांची सेवा करीत असताना दिसत आहेत.

स्थानिक बंगाली कॅम्प परिसरातील अपनापन वृद्धाश्रम हे स्वयं: अर्थसहाय्यीत, तुटपुंज्या सामाजिक मदतीने चालविला जात असलेला एक मानवतावादी उपक्रम आहे. या अंतर्गत जमेल तशा पद्धतीने वृद्धांना सहकार्य करुन त्यांची सुश्रुषा केली जात आहे.

नुकतेच स्थानिक आयुध निर्माणी मधील अनुभाग आठ मधील कर्मचाऱ्यांच्या वतीने या वृद्धाश्रमात उपक्रम घेण्यात आला. कुमार उत्कर्ष जितेंद्र साखरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भोजन देण्यात आले.

विजय (हनु) पारधे, रवी चांदेकर, सुशील मेश्राम, रवी पाटील, जितू साखरकर, अमोल शेळकी, वामन बलकी, बाळा पेटकर, राजीक भाई, दिनेश श्रीकुंटवार, संजय पडोळे, नितीन आगलावे, भीमा मानकर, आदम पानतावणे, सुरेश भोवते, भूषण बोधाने, प्रमोद वानखेडे, बारापात्रे या तरुण मंडळींचा सदर उपक्रमात सहभाग आहे. वृद्धाश्रमाला सहकार्य व्हावे या भावनेतून आर्थिक मदत देखील करण्यात आली.

एखाद्या विशेष प्रसंगाच्या निमित्ताने अथवा सहजच शहरातील इतरांनी येवून वृद्धाश्रमाला भेट द्यावी, अशी अपेक्षा या मंडळींनी केली आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये