ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भद्रावती तहसील कार्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

         भद्रावती तहसील कार्यालय तर्फे दिनांक 24 डिसेंबरला भद्रावती तहसील कार्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी उपजिल्हाधिकारी तथा तहसीलदार बालाजी कदम हे अध्यक्षस्थानी तर प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे भद्रावती तालुका अध्यक्ष बालाजी दांडेकर, नायब तहशीलदार मधुकर काळे तसेच प्रमुख मार्गदर्शक म्हणुन जिल्हा ग्राहक पंचायतीचे मार्गदर्शक पुरुषोत्तम मते, प्रा. गोपाल घुमे, जिल्हाउपाध्यक्ष वामन नामपल्लीवार, विदर्भ प्रांत कार्यकारणी सदस्य वसंत वराटे, प्रचार आयाम प्रमुख अतुल कोल्हे, प्रवीण चिमुरकर, वतन लोने आदी मान्यवर उपस्थित होते.

           यावेळी तहसीलदार कदम यांनी ग्राहक पंचायतीच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेच्या समस्यांचे निराकरण करण्यात येत असून ग्राहकांविषयांचे मार्गदर्शन करण्यात येते. त्यामुळे काही तक्रारी असल्यास नागरिकांनी भद्रावती ग्राहक पंचायतीसी संपर्क साधून आपल्या समस्यांचे निराकरण करावे असे आवाहन तालुक्यातील नागरिकांना केले.

              या कार्यक्रमांचे संचालन हर्षा दुधे पुरवठा निरीक्षक अधिकारी तसेच आभार प्रदर्शन रति मस्के कनिष्ठ लिपिक तहसील कार्यालय भद्रावती यांनी केले असून या कार्यक्रमाला अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे सर्व पदाधिकारी, सदस्य तथा तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये